आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पिझ्झा, बिर्यानीची मेजवानी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पिझ्झा, बिर्यानीची मेजवानी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांना पिझ्झा, बिर्यानी असं जेवण दिलं जात आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी या आंदोलनाला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 14 डिसेंबर: नवीन कृषी कायदे (New Farm Acts) शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचं सांगत हरियाणा, पंजाब आणि इतर राज्यांमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन (Protest) करत आहेत. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात वाटाघाटीसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या पण त्या सर्व निष्फळ ठरल्यानं अजूनही हे आंदोलन सुरू आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर आंदोलनापेक्षा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली शाही व्यवस्थेची जोरदार चर्चा असून, त्यावर टीकेची झोडही उठत आहे.

हे शेतकरी दररोज पिझ्झा, बिर्याणीसह वेगवेगळ्या डेझर्टच्या शाही भोजनाचा (Lavish Meals) आस्वाद घेत असून, त्यांच्यासाठी फूट मसाजर खुर्च्यांसह (Foot Massager Chairs) विविध सेवासुविधांनी सुसज्ज निवास व्यवस्था करण्यात आली आहे.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून अनेक संघटनांनी भरघोस मदत केली असून, शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या राहण्या-खाण्याची शाही बडदास्त ठेवण्यात आली आहे. पंचतारांकीत हॉटेलात असतील अशा सुविधा इथं आहेत.

सध्या दिल्लीत कडाक्याची थंडी असल्यानं शेतकऱ्यांना गरमागरम रोटी मिळावी याकरता भलमोठं रोटी मेकिंग मशीन (Roti Making Machine) बसवण्यात आलं आहे. त्यावर एका तासाला 1500 ते 2000 रोट्या तयार होतात. खालसा एड (khalasa Aid) या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेनं तर शेतकऱ्यांसाठी फूट मसाज सेंटरच (Foot Massage Centre)उभारलं आहे. एका तंबूत 25 फूट मसाजर चेअर्स असून प्रत्येक शेतकऱ्याला दहा मिनिटांचा फूट मसाज दिला जातो. द ट्रिब्युननं (The Tribune) दिलेल्या वृत्तानुसार, सिंघू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेत वैविध्यपूर्ण भोजनाचीही व्यवस्था आहे. बारमी आणि बोपाराई गावातील शेतकऱ्यांच्या भारतीय किसान संघटनेनं (Bhartiya Kisan Sanghtana) चहा, खाणं देण्याची व्यवस्था केली होती, आता तर त्यांनी पिझ्झा लंगर (Pizza Lunger) सुरू केला आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना समाजातील अनेक स्तरांवरून मदत मिळत असून, त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मदतीबद्दल आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या वेबसाईटवर दखल घेतली जात असून प्रशंसेसह त्याबाबत माहिती दिली जात आहे.

सोशल मीडियावर शेतकऱ्यांना पुरवण्यात येत असलेल्या शाही सुविधांवर टीका होत असून, हे खरेच शेतकरी आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. खरे शेतकरी सध्या शेतीच्या कामात मग्न आहेत, मग हे कुठले शेतकरी?, आरामदायी बेड, स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेऊन आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांना आंदोलनाचा खरा अर्थच नाहीसा करून टाकल्याची टीका अनेकांनी केली आहे. पिझ्झा, ड्राय फ्रुट्स, चहा, दुध, अस्सल तूप लावलेली गरमा गरम रोटी, डाळ, स्वादिष्ट भाज्या, तंबूमध्ये आरामदायी बेडस .... हे आहे आधुनिक काळातलं आंदोलन, ....यही तो है अच्छे दिन ! , हे आंदोलन आहे की   पिकनिक, आंदोलन की पिझ्झा पार्टी ...  अशी टीका नेटीझन्स करत आहेत. तसंच आता यापुढं जाकुझी, सोना बाथ, जिम, ब्युटीपार्लर्स, आणि अगदी ड्रग जॉईन्टसही येणार आहेत....अशी उपहासात्मक टिपण्णीही सोशल मीडियावर दिसून येत आहे.

आंदोलनकर्ते शेतकरी बिर्याणी खात असतानाचे फोटो, व्हिडीओ  व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर ‘शाहीन बाग 2’ (Shaheen Bagh 2)या नावानं हे आंदोलन ओळखलं जाऊ लागलं. देशद्रोही आणि खलिस्तानीवादी घटकांचा या आंदोलनात सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे.  ‘बिर्याणी’ (Biryani)हा देशविघातक पदार्थ (Anti National food) म्हणून त्यावर टीका होत आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (Citizenship Amendment Act -CAA) शाहीन बाग (Shaheen Bagh) आंदोलन करण्यात आलं.  देशात सामाजिक तेढ निर्माण करण्याकरता आणि नागरिकत्व कायद्याबाबत गैरसमज पसरवण्याकरता जाणीवपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीनं पैसे देऊन हे आंदोलन घडवण्यात आलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी आंदोलनकर्त्यांना बिर्याणी देण्यात येत होती. तेव्हापासून अशा आंदोलनाला बिर्याणी हा समानार्थी शब्द म्हणून प्रसिद्ध झाला.

त्याचबरोबर खलिस्तानवादी चळवळीचा (Khalistan Movement) या आंदोलनाशी संबंध असल्याचाही आरोप होत आहे. मात्र यासंदर्भात शेतकरी आंदोलनाचे म्हणून सोशल मीडियावर टाकण्यात आलेले व्हिडिओ, फोटो जुने असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 14, 2020, 1:35 PM IST

ताज्या बातम्या