Home /News /national /

CAA-NRC आंदोलनातील मृतांची संख्या वाढली; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

CAA-NRC आंदोलनातील मृतांची संख्या वाढली; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

तृणमूल कॉंग्रेसने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे

    मुर्शिदाबाद, 29 जानेवारी : पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद येथील जालंकी भागात CAA-NRC विरोधात जोरदार प्रदर्शन सुरू होते. हे प्रदर्शन हिंसक झाल्याने दोघांचा मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी एका मृत झालेल्या व्यक्तीचे नाव अनारुल बिस्वास असून त्याच्या शरीरावर गोळी लागल्याच्या खुणा आहेत. येथील स्थानिकांनी बंद पुकारला होत. यादरम्यान तृणमूल कॉंग्रेसचे ब्लॉक प्रमुख ताहिरुद्दीन शेख आपल्या टीमसोबत तेथे पोहोचले आणि आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार केला. यानंतर आंदोलन चिघळले. येथील काही उपद्रवी लोकांनी वाहनांना आग लावली. टीएमसीच्या स्थानिक नेत्यांनी हे आरोप नाकारले आहेत. त्यांनी या हिंसेमागे कॉंग्रेस आणि सीपीएमच्या स्थानिक नेत्यांचा हात असल्याचे सांगितले. त्यांनी असा आरोप केला आहे की तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते त्या भागातून दुसऱ्या ठिकाणी जात होते तेव्हा त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यांपासून देशभरात आंदोलन सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. CAA ला विरोध करणाऱ्या आंदोलनादरम्यान एकाच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील मुरशीबाद येथे CAA-NRC विरोधात आंदोलन उगारले होते. येथे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्राने देशभरात CAA लागू केल्यापासून विरोध प्रदर्शन सुरू आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी CAA विरोधात अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आता तर हा मुद्दा परदेशातही चर्चिला जात असून युरोपातील संसदेत या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे. मात्र भारताने युरोपातील संसदेवरील चर्चेवर नाराजी व्यक्त केली होती. युरोपातील संसद (European Parliament) भारताच्या नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात (Citizenship Act) त्यांच्या काही सदस्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान करणार आहेत. युरोपातील संसदेत या आठवड्याच्या सुरुवातीला युरोपियन युनायटेड लेफ्ट (European United Left) नॉर्डिक ग्रीन लेफ्ट (Nordic Green Left) यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार CAA वर चर्चा होणार असून याच्या एक दिवसानंतर मतदान करणार असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या पंधरा डिसेंबरला राजधानी दिल्लीतील शाहिन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू होऊन जवळपास पंचेचाळीस दिवसाचा कालावधी झाला आहे. आगामी अजून किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही. जोपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा परत घेतल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा चंग शाहीन बाग आंदोलनकर्त्यांनी बांधला आहे. या आंदोलनामध्ये महिला बालक आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. महिला या समाजातील पहिल्या घटक आहे, हे समजुन या आंदोलनात जे धरणे प्रदर्शन सुरू आहे. त्या धरणे प्रदर्शनात सर्वात प्रथम महिला बसलेल्या आहेत. या महिलांमध्ये मुली तरुणी आणि वयोवृद्ध महिला सहभागी झालेल्या आहेत. यांच्यासाठी येथे हे मंडप टाकण्यात आलेला आहे. या मंडपाच्या आत थंडीची पर्वा न करता या महिला आंदोलन करत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Iucaa, NRC, Protest

    पुढील बातम्या