News18 Lokmat

गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध

त्यांच्या हत्येचा निषएध करणारे मोर्चे देशभरात निघत आहे. मुंबई पुण्यातूनही त्यांच्या हत्येचा निषेध होतो आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2017 11:55 AM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध

06 सप्टेंबर: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या हा कटच असल्याचं कर्नाटकच्या कायदा मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या हत्येचा देशभरातून निषेध केला जातोय .

कर्नाटकातल्या ज्येष्ठ पत्रकार आणि संपादिका गौरी लंकेश यांची काल बंगळुरूत निर्घृण हत्या करण्यात आली. त्या लंकेश पत्रिके मासिकाच्या त्या संपादिका होत्या. उजव्या राजकारण्यांविरोधात त्यांनी बरंच लिखाणही केलं होतं. रेणुका शहाणे यांनी ट्विटरवरुन हत्येचा निषेध केला आहे.' एक पुरोगामी, योग्य आवाज अज्ञात हल्लेखोरांनी दाबला. गौरी लंकेश यांच्या आत्म्याला शांती मिळो.दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांना कुणी मारलं?'असं ट्विट त्यांनी केलं .

Loading...

त्यांच्या हत्येचा निषेध करणारे मोर्चे देशभरात निघत आहे. मुंबई पुण्यातूनही त्यांच्या हत्येचा निषेध होतो आहे. काँ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी मेधा पानसरे यांनीही निषेध व्यक्त केला आहे. पुरोगामी विचारांच्या व्यक्तीची हत्या होण्याची कर्नाटकातली ही दोन वर्षातली दुसरी घटना आहे. या आधी ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015ला हत्या करण्यात आली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2017 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...