उन्नाव-कठुआ प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जनता आक्रमक, फाशीच्या शिक्षेसाठी देशभरात निषेध मोर्चा

उन्नाव-कठुआ प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जनता आक्रमक, फाशीच्या शिक्षेसाठी देशभरात निषेध मोर्चा

या दोन्ही प्रकरणाचा निषेध करण्यासाठी लोक फक्त रस्त्यावरच आक्रमक नाही तर सोशल मीडियावरही या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मोठं आंदोलन सुरू आहे.

  • Share this:

16 मार्च : उन्नाव आणि कठुआमधल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काल राज्यभर काँग्रेसकडून कँडल मार्च काढण्यात आला. मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरात काँग्रेसनं कँडल मार्चचं आयोजन केलं. नागपूरमध्ये देखील संविधान चौकात काँग्रेसनं कँडल मार्चचं आयोजन केलं होतं. तर नंदुरबारमधल्या कँडल मार्चमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

या दोन्ही प्रकरणाचा निषेध करण्यासाठी लोक फक्त रस्त्यावरच आक्रमक नाही तर सोशल मीडियावरही या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मोठं आंदोलन सुरू आहे.

काँग्रेसनं मुंबईत काढला कँडल मार्च

मुंबईतील जुहू चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मार्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम तसेच काँग्रेसचे सर्व आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मार्चमध्ये सहभागी झाले होते. केंद्र आणि राज्य सरकार सामान्य माणसाला न्याय देण्यास अपयशी ठरत असल्याची टीका यावेळी संजय निरुपम यांनी केलीय.

मुंबईकरांसोबत सेलिब्रिटीही एकत्र, कठोरातली कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी

या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी कार्टर रोडवर काल मुंबईकरांसोबत सेलिब्रिटीही एकत्र आले. यावेळी उपस्थितांनी निषेधाचे फलकही आणले होते. किरण राव, राजकुमार राव, ट्विंकल खन्ना, विशाल ददलानी, सपना भवानी यांच्यासह अनेकांनी आरोपींवर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

पुण्यातल्या गुडलक चौकात निषेध मोर्चाचं आयोजन

या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी पुण्यातही निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातल्या गुडलक चौकात विविध सामाजिक संघटना एकत्र आल्या होत्या. कठुआ बलात्कार घटनेमध्ये पोलिसांचाही सहभाग असल्यानं सामाजिक संघटनांकडून काश्मीर पोलिसांचा निषेध करण्यात आला.

'अल्पवयीन मुलींवर 'बलात्कार करणाऱ्यांना फाशीच व्हावी' - अमृता फडणवीस

काश्मीरच्या कठूआ बलात्कार हत्या प्रकरणी आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी सर्वच थरातून आरोपीना फाशी व्हावी अशी मागणी जोर धरते आहे. अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील केली आहे. लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी आणि फाशी व्हावी दुसरी कोणतीच शिक्षा होऊ नये असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

 

First published: April 16, 2018, 8:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading