पावसामुळे धान आणि डाळीचे उत्पन्न घटण्याची शक्यता

पावसामुळे धान आणि डाळीचे उत्पन्न घटण्याची शक्यता

यावर्षी अन्नधान्य डाळ आणि धानासह मक्याच्या उत्पादन साधारण 50 लाख टनाने कमतरता येण्याचा अंदाज आहे.

  • Share this:

2 ऑक्टोबर: यावर्षी झालेल्या पावसामुळे देशात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर अनेक ठिकाणी पुरेसा पाऊसच पडलेला नाही. मान्सूनच्या पाऊसाच्या या अनियमिततेमुळे यावर्षी खरीपाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यावर्षी अन्नधान्य डाळ आणि धानासह मक्याच्या उत्पादन साधारण 50 लाख टनाने कमतरता  येण्याचा  अंदाज आहे. 75 टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या, मात्र मान्सूनचा लहरीपणा यावर्षी वाढला आणि त्यामुळे उत्पन्नात घट होईल हे स्पष्ट झाले आहे. कृषी मंत्रालयाच्या अनुमानानुसार यावेळी खरिपाचे उत्पादन 13 कोटी 46 लाख 70 हजार टन राहील, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 46.6 लाख टनाने कमी आहे- त्यात तूर डाळ गेल्या वर्षी 47.8 लाख टन उत्पादित झाली होती, यावर्षी तूर 39.9 लाख टन निघेल, उडीद 25.3 लाख टनाऐवजी 21.7 लाख टन तर विविध अन्नधान्यचे उत्पादन 3 कोटी 14 लाख 90 हजार टन राहील, जे गेल्या वर्षी 3 कोटी 27.1 लाख टन झाले होते. तसेच मक्याच्या उत्पादनातही सुमारे 8 लाख टनाची घट होऊ शकते.

तेव्हा यावर्षी या कमतरतेला सामोरं जाण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 09:58 AM IST

ताज्या बातम्या