S M L

कशी होते राष्ट्रपतीची निवडणूक?

आपल्या राष्ट्रपतीची निवड ही अप्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतून होते. म्हणजेच लोकांना डायरेक्ट राष्ट्रपती निवडीचा अमेरिकेसारखा अधिकार नाही. तर लोकांनी निवडून दिलेले खासदार आमदार हे राष्ट्रपतीची निवड करतात.

Sonali Deshpande | Updated On: Jul 17, 2017 10:59 AM IST

कशी होते राष्ट्रपतीची निवडणूक?

17 जुलै : आपल्या राष्ट्रपतीची निवड ही अप्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतून होते. म्हणजेच लोकांना डायरेक्ट राष्ट्रपती निवडीचा अमेरिकेसारखा अधिकार नाही. तर लोकांनी निवडून दिलेले खासदार आमदार हे राष्ट्रपतीची निवड करतात.

आपलं राष्ट्रपतीचं पद हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. देशाचा कारभार हा राष्ट्रपतीच्या नावावर प्रत्यक्षात पंतप्रधान हाकतात. राष्ट्रपतींकडे म्हणूनच प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख म्हणून पाहिलं जातं. लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुखही राष्ट्रपती आहे. पण हे सगळं नामधारी. प्रत्यक्षात सगळे अधिकार हे पंतप्रधानांकडे आहेत. बहुमतवाल्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो तर राष्ट्रपतींची निवड खासदार आमदार करतात. पाहुयात ही प्रक्रिया कशी असते.

- राष्ट्रपतीच्या निवडणुकीत फक्त निवडून



आलेल्या खासदार, आमदारांना मतदान अधिकार

- विधान परिषदेचे आमदार किंवा नियुक्त खासदारांना

राष्ट्रपती निवडीचा अधिकार नाही

Loading...
Loading...

-प्रत्येक खासदार, आमदाराच्या मताचं मूल्य ठरतं, ते वेगवेगळं असतं

-ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या आमदारांच्या मतांचं मूल्य सर्वाधिक

-लोकसभा आणि राज्यसभा मिळून 776 खासदार मतदान करणार

-एका खासदाराच्या मताचं मूल्य हे 708 इतकं असेल

-29 राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशातले 4120 आमदार मतदान करणार

-मूल्यानुसार 10 लाख 98 हजार 882 इतकी मतं निवडणुकीत असतील

गेल्या तीन वर्षात भाजपनं एका पाठोपाठ एक अशी राज्य जिंकलीयत. त्यात सर्वाधिक मूल्य असलेल्या उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. त्यामुळेच भाजपचं पारडं जड आहे. थोडीशी राजकीय गणितं आता पाहुयात.

काय आहे राजकीय स्थिती?

सध्यस्थितीत भाजप किंवा एनडीएची

13 राज्यांमध्ये तर काँग्रेसची 6 राज्यात सत्ता

एनडीएकडं 5 लाख 27 हजार 371 मतं आहेत

हाफ मार्कसाठी 20 हजार मतं कमी

यूपीएकडं 1 लाख 73 हजार 849 मतं आहेत

तर इतर पक्षांकडे जवळपास 35 टक्के मतं

एनडीएच्या मतांची टक्केवारी 48 टक्के आहे

तर यूपीएच्या मतांची 15 टक्के

भाजपला यूपीएत नसलेल्या इतर पक्षांचा

पाठिंबा मिळण्याचा विश्वास

भारतीय राष्ट्रपतीपदाच्या निवडीची प्रक्रिया तशी म्हटलं तर किचकट आहे. पण अधिकारांच्या बाबतीत मात्र स्पष्टता ठेवली गेलीय. सध्या ह्याच निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण बहुमत काठावर असताना राष्ट्रपतीची भूमिका निर्णायक आणि ऐतिहासिक ठरते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 10:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close