मोदी सरकारची परीक्षा, राफेलबाबत आज होणार मोठा निर्णय!

मोदी सरकारची परीक्षा, राफेलबाबत आज होणार मोठा निर्णय!

राफेल करारातील कथित अनियमिततेसाठी सीबीआयला FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकांद्वारे करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 : वादग्रस्त राफेल कराराबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. राफेल कराराची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, यासाठी अॅड. विनीत ढांडा यांनी याचिका दाखल केली होती. तसंच सरकारवर विविध आरोप करत या कराराविरोधात इतरही काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

राफेल करारातील कथित अनियमिततेसाठी सीबीआयला FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकांद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे आज राफेल प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात सरकारची मोठी परीक्षा आहे, असं म्हटलं जात आहे.

काय आहे राफेल प्रकरण?

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी किंपनी 'एचएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे.

राफेलच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. तसंच या मुद्द्यावरून राहुल यांनी राफेल विमान बनवणाऱ्या ‘दसॉ’ या कंपनीवरही आरोप केले होते.

राफेलवरून फ्रान्समध्येही वादंग

भारतामध्ये गेल्या काही काळापासून चर्चेत असणाऱ्या राफेल करारावरून फ्रान्समध्ये वातावरण तापलं आहे. फ्रान्समधील एका भ्रष्टाचारविरोधी संस्थेने राफेल कराराबाबतची माहिती द्यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी सरकारकडे केली आहे.

भ्रष्टाचारविरोधी संस्थेने अर्थविषयक कार्यालयाकडे तक्रार नोंदवत भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या वादग्रस्त राफेल कराराची माहिती सरकारने द्यावी. तसंच या याप्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. शेरपा नावाची ही संस्था फ्रान्समध्ये भ्रष्टाचाराविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी ओळखली जाते.

‘कोणत्या परिस्थतीत फ्रान्सच्या 36 लढाऊ विमानांचा भारतासोबत करार केला आणि अनिल अंबानी यांच्या कंपनीला या करारासाठी निवडण्याचा काय उद्देश होता,’ असा सवाल ही तक्रार दाखल करताना या संस्थेने केला आहे.

'मीडियापार्ट' या फ्रेन्चमधील वेबसाईटच्या वृत्तानुसार, ‘राफेल करारात मोठा भ्रष्टाचार आणि पैशांची अफरातफर झाली आहे,’ असा संशय शेरपा या संस्थेने व्यक्त केला आहे. याप्रकरणाची लवकरच चौकशी होईल आणि सत्य समोर येईल, अशी आशा तक्रार दाखल करणाऱ्या संस्थेनं व्यक्त केली आहे.

VIDEO : नेत्यांची होणार राष्ट्रवादीत घरवापसी, अजित पवारांचा मोठा खुलासा

First published: December 14, 2018, 9:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading