PHOTOS : काँग्रेसचं 'मोदी स्टाईल' उत्तर, प्रियांकांचा फोटो असणाऱ्या साड्या मार्केटमध्ये

अनेक राज्यांतून प्रियांका यांची प्रतिमा असणाऱ्या साड्यांना मोठी मागणी आहे, असं या विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 01:04 PM IST

PHOTOS : काँग्रेसचं 'मोदी स्टाईल' उत्तर, प्रियांकांचा फोटो असणाऱ्या साड्या मार्केटमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पेहरावातील स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यांचा मोदी कुर्ताही चांगलाच लोकप्रिय झाला होता.

राजकारणातील युद्ध हे वेगवेगळ्या पातळ्यांवर खेळलं जातं. जाहिरात आणि जनसंपर्क हे नेत्यांच्या ब्रँडिंगच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात.

गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा प्रकारच्या अनेक आयुधांचा उपयोग आपलं व्यक्तीमत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करत असतात.

Loading...

मोदींच्या याच फंड्याला आता काँग्रेसकडूनही जोरदार उत्तर दिलं जात आहे.

गुजरातमधील सुरतच्या मार्केटमध्ये सध्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा फोटो असणाऱ्या साड्या तयार केल्या जात आहेत.

या साड्यांमध्ये अनेक प्रकारच्या डिझाईन्स असल्याचं पाहायला मिळत आहे.

या साडीवर प्रियांका यांच्यासोबत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही फोटो दिसत आहे.

गुजरातमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या देशपातळीवरील बैठकीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या अशाच पद्धतीच्या साड्या परिधान करून येण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या देशपातळीवरील बैठकीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या अशाच पद्धतीच्या साड्या परिधान करून येण्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांतून प्रियांका यांची प्रतिमा असणाऱ्या साड्यांना मोठी मागणी आहे, असं या विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

अनेक राज्यांतून प्रियांका यांची प्रतिमा असणाऱ्या साड्यांना मोठी मागणी आहे, असं या विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

त्यामुळे प्रत्यक्ष मैदानाबरोबरच हे राजकीय युद्ध सोशल मीडिया आणि अशा प्रकारच्या अनेक युक्त्या वापरून लढलं जाणार, असं सध्या चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2019 01:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...