प्रियांका गांधींचं असं आहे ‘मिशन वायनाड’

प्रियांका गांधींचं असं आहे ‘मिशन वायनाड’

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी देखील प्रियांका गांधी जोरदार प्रचार करणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरदार सुरूवात झाली आहे. उमेदवार आपला लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाड या ठिकाणाहून देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन करत राहुल गांधी यांनी वायनाड आणि अमेठी या दोन्ही ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही मतदारसंघात सध्या काँग्रेस प्रचार देखील जोरात करत आहे. शिवाय, प्रियांका गांधी देखील राजकारणात उतरल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायाला मिळत आहे. भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी आता प्रियांका गांधी यांनी देखील कंबर कसली आहे.

वायनाडमध्ये देखील प्रियांका करणार प्रचार

दरम्यान, प्रियांका गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ वायनाड येथे रॅली काढणार आहेत. 20 आणि 221 एप्रिल रोजी प्रियांका गांधी या वायनाडमध्ये प्रचार करतील. 15 एप्रिल ते 27 एप्रिल या दरम्यान प्रियांका गांधी देशभर झंझावती दौरे करणार आहेत. 23 एप्रिल रोजी प्रियांका उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे प्रचार करतील. त्यानंतर देशातील विविध भागांमध्ये प्रियांका गांधी प्रचार करणार आहेत.

वाराणसी: मोदींविरोधात 111 शेतकरी, BSF जवान आणि निवृत्त न्यायाधीश

प्रियांका गांधी वाराणसीतून रिंगणात?

उत्तर प्रदेशमधील हायप्रोफाईल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध काँग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवण्याचा विचार करत आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेस धक्का देण्याचा विचार करत आहे.

गेल्या म्हणजेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देखील त्यांच्या विजयी मतांचे अंतर पाहता काँग्रेस सक्रीय झाले आहे. ज्या प्रमाणे राहुल गांधी यांना भाजपने अमेठीमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे मोदींना वाराणसीमध्ये घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अर्थात यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. वाराणसीतून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा करण्याआधी काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्याशी चर्चा करेल. या दोन्ही पक्षांकडून काँग्रेस पाठिंबा मागू शकते.

SPECIAL REPORT : उदयनराजेंना शिवसेनेच्या 'वाघा'ची धमकी!

First published: April 14, 2019, 9:15 AM IST

ताज्या बातम्या