मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रियांका गांधी कुठे आहेत? नेत्यांना झाली स्वागताची घाई!

प्रियांका गांधी कुठे आहेत? नेत्यांना झाली स्वागताची घाई!

घोषणा झाल्यानंतर सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची रिघ लागली ती काँग्रेस मुख्यालयाकडे. मात्र प्रियांका या सध्या कार्यालयात नाहीत असं सांगण्यात आलं.

घोषणा झाल्यानंतर सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची रिघ लागली ती काँग्रेस मुख्यालयाकडे. मात्र प्रियांका या सध्या कार्यालयात नाहीत असं सांगण्यात आलं.

घोषणा झाल्यानंतर सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची रिघ लागली ती काँग्रेस मुख्यालयाकडे. मात्र प्रियांका या सध्या कार्यालयात नाहीत असं सांगण्यात आलं.

नवी दिल्ली 23 जानेवारी : काँग्रेसने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत प्रियांका गांधी यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. प्रियांकांनी राजकारणात यावं अशी कार्यकर्त्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. ही मागणी पूर्ण झाल्याने आता सगळ्यांना भेटून प्रियांका गांधी यांचं अभिनंदन करायचं आहे. पण प्रियांका गांधी या सध्या भारतात नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

घोषणा झाल्यानंतर सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची रिघ लागली ती काँग्रेस मुख्यालयाकडे. सर्वांना प्रियांकांना भेटायचं होतं, पुष्पगुच्छ द्यायचे होते. मात्र प्रियांका या सध्या कार्यालयात नाहीत असं सांगण्यात आलं.

प्रियांका गांधी या सध्या अमेरिकेत असून मुलीच्या उपचारासाठी त्या अमेरिकेला गेल्या आहेत. 1 फेब्रुवारीला त्या परत येणार असून त्यानंतरच नव्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय.

कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली

प्रियांका गांधी यांच्या या राजकीय प्रवेशाने उत्तर प्रदेशचं गणित बदण्याची शक्यता आहे. याधीही प्रियांकांनी उत्तर प्रदेशात प्रचार केला होता. पण त्यांचा प्रचार फक्त अमेठी आणि रायबरेली मतदार संघापुरताच मर्यादीत होता. गेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांनी गावागावत जाऊन प्रचार केला होता. मात्र सक्रिय राजकारणात येण्याचं त्यांनी टाळलं होतं.

उत्तर प्रदेशात या आधी समाजवादी पक्ष आणि बसपाची आघाडी झाली होती. त्यामुळे मुस्लिम, दलित आणि यादव मतदारांचं ध्रुविकरण होणार असा अंदाज बांधला जात होता. त्याचा फटका काँग्रेसलाच बसला असता. त्यामुळे तातडीने पावलं टाकत काँग्रेसने प्रियांका गांधी यांनी पूर्व उत्तर प्रदेशची कमान दिली.

भाजपकडून योगी आदित्यनाथ यांच्याकडे नेतृत्व असल्याने त्यांच्या उग्र हिंदुत्वाचा उत्तर देण्यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना पुढे केलं अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

VIDEO : खून करायचा का माझा? जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची

First published:

Tags: #rahulgandhi, Congress, Priyanka gandhi, Uttar pradesh, Yogi Aadityanath, प्रियांका गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी