नवी दिल्ली 3 नोव्हेंबर : WhatsApp माध्यमातून हेरगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सरकारने याप्रकरणी व्हॉटसअॅपला नोटीस पाठवून उत्तर देण्यासही सांगितलं होतं. कंपनीने त्यावर उत्तरही दिलं होतं. आता काँग्रेसनेच धक्कादायक खुलासा केलाय. ज्या लोकांचे फोन्स हॅक झाले त्यांना WhatsAppकडून मेसेज आले आहेत. असाच मेसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना आल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांचा फोनही हॅक झाला होता असं स्पष्ट होते असा दावा काँग्रसेने केलाय. काँग्रेसच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. देशातचे राजकारणी, मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन्स WhatsAppच्या माध्यमातून हॅक करण्यात आले होते असा गंभीर आरोप करण्यात आला होता.
शिवसेनेच्या आक्रमक बाण्यासमोर भाजप झुकणार? फॉर्म्युल्याबाबत फेरविचार सुरू
यावर कंपनीने सरकारला जे उत्तर दिलं त्यात म्हटलं आहे की, हेरगिरीबाबत कंपनीने सरकारला यावर्षी मे महिन्यात कल्पना दिली होती. एका इस्रायलच्या स्पायवेअरच्या मदतीने अनेक देशांमधील अधिकारी, पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर विरोधकांनी सरकारवरच हल्लाबोल करत हेरगिरी केल्याचा आरोप केला होता. व्हॉटसअपने शुक्रवारी जाहीर केलं की, ककोणत्याही युजरची गोपनीयता आणि सुरक्षा याला आमचं प्राधान्य असतं. आम्ही हे प्रकरण सोडवलं होतं. तसेच भारतासह इतर देशांच्या सरकारला याबाबत सावधही केलं होतं.
Randeep Surjewala, Congress: When WhatsApp sent messages to all those whose phones were hacked, one such message was also received by Priyanka Gandhi Vadra. pic.twitter.com/yIulj78GeY
— ANI (@ANI) November 3, 2019
'मला नुकताच संजय राऊतांचा मेसेज आला', अजित पवारांचा गौप्यस्फोट
स्पायवेअरच्या मदतीनं मोबाइल हॅक केल्याचं प्रकरण वाढल्यानंतर माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 2011 ते 2013 या काळात तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि जनरल व्ही के सिंग यांची हेरगिरी झाल्याचं सांगत व्हॉटसअॅपकडे उत्तर मागितलं होतं. याशिवाय भारतातील पत्रकार, मानवाधिकार यांचेही फोन हॅक झाल्याचं उघड झालं होतं. एनएसओ कंपनीवर व्हॉटसअॅप सर्व्हरचा वापर केल्याचा आऱोप आहे. त्याच्या माध्यमातून 29 एप्रिल 2019 ते 10 मे 2019 या कालावधीत 1 हजार 400 युजर्सच्या मोबइल फोनवर मालवेअर अटॅक करण्यात आला. त्यातून हेरगिरी करण्यात आली. यामध्ये 20 देशांमधील पत्रकार, सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
अमेरिका, युएई, बहरीन, मेक्सिको, पाकिस्तान, भारत या देशांमधील लोकांचे फोन हॅक झाले. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं मात्र, नेमकं याच देशांमधील अधिकारी आणि लोकांचे फोन हॅक झाले. त्यांच्यावर पाळत ठेवली गेली हे निश्चितपणे सांगता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Priyanka gandhi