'यूपीमध्ये दिवसाढवळ्या फिरतात गुंड', प्रियांकांच्या या ट्वीटला उत्तर प्रदेश पोलिसांचं उत्तर

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी एक ट्वीट करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हल्ला चढवला होता. उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांसमोर आत्मसमर्पण केलं आहे का, असा सवालही त्यांनी या ट्वीटमध्ये विचारला होता. त्यावर उत्तर प्रदेश सरकारने आकडेवारी देऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 04:05 PM IST

'यूपीमध्ये दिवसाढवळ्या फिरतात गुंड', प्रियांकांच्या या ट्वीटला उत्तर प्रदेश पोलिसांचं उत्तर

लखनौ, 29 जून : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी एक ट्वीट करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हल्ला चढवला होता. उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांसमोर आत्मसमर्पण केलं आहे का, असा सवालही त्यांनी या ट्वीटमध्ये विचारला होता.

उत्तर प्रदेश सरकारचं उत्तर

प्रियांका गांधींच्या या ट्विटवर उत्तर प्रदेश सरकारने आकडेवारी देऊन उत्तर दिलं आहे. गेल्या दोन वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये 81 गुन्हेगार एन्काउंटरमध्ये मारले गेले तर 9 हजार 225 गुन्हेगारांना अटक करण्यात आली, असं उत्तर प्रदेश सरकारने म्हटलं आहे.

पाहा 'मेन इन ब्ल्यू' कसे दिसतात भगव्या रंगात, PHOTO VIRAL

राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार, 2 अब्जांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दरोडे, खून, लूट आणि अपहरण या घटनांचं प्रमाण कमी झालं आहे. त्यासोबतच गुन्हेगारीचं प्रमाणही सुमारे 35 टक्क्यांनी घटलं आहे, गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली आहे, असंही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Loading...

लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी होती. त्यावेळी प्रचारमोहिमेमध्ये प्रियांकांनी उत्तर प्रदेशमधल्या जनतेशी संवाद साधला. पण निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. तरीही काँग्रेस आणि भाजपमधले आरोप प्रत्यारोप थांबलेले नाहीत. प्रियांका गांधींच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा या राजकारणात भरच पडली आहे.

================================================================================================

देवळाली रेंजमधला हा VIDEO पाहून पाकला नक्कीच धडकी भरेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...