पोलिसांनी गळा दाबला या आरोपावर प्रियांका गांधींचा युटर्न

पोलिसांनी गळा दाबला या आरोपावर प्रियांका गांधींचा युटर्न

पोलिसांनी गळा दाबल्याच्या वक्तव्यावर प्रियांका गांधींनी युटर्न घेत पोलिसांनी गळ्याला हात लावल्याचा म्हटलं आहे.

  • Share this:

लखनऊ, 28 डिसेंबर : देशात नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून आंदोनल केलं जातं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या शनिवारी लखनऊ दौऱ्यावर गेल्या होत्या. तेव्हा नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनावेळी हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी प्रियंका गांधींनी चालत जाण्यास सुरुवात केली. काही अंतर चालल्यानंतर प्रियांका गांधी चक्क एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून पुढे गेल्या. यावेळीही पोलिस गाडी त्यांच्या पाठोपाठ होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांका गांधी एसआर दारापुरी यांच्या घरी पोहोचल्या यावेळी समर्थकही तिथे जमले होते. प्रियांका गांधी यांच्या हालचालींवर पोलीस प्रशासनाची कडी नजर होती. दारापुरीच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्या हिंसाचारामध्ये अटक केलेल्या सदफ जफरच्या घरी गेल्या होत्या. या दरम्यान, लखनऊ पोलिसांनी प्रियांका यांच्यासोबत धक्काबुक्की झाल्याचा आणि थेट त्यांचा गळा पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आपला गळा दाबला असा आरोप केल्यानंतर त्यांनी युटर्न घेतला आहे. पोलिसांनी आपल्याला अडवलं आणि गळ्याला हात लावला. त्यानंतर खाली पाडल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.

प्रियांका गांधी यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोलिसांच्या धक्काबुक्कीविषयी लिहलं आहे. 'यूपी पोलिसांची ही काय कारवाई आहे? आता मला कुठेही जाण्यापासून रोखलं जात आहे. मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि समाजसेवक एस.आर. दारापुरी यांच्या घरी जात होते. एनआरसी आणि नागरिकत्व कायद्याचा विरोध केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मला जबरदस्तीने थांबवलं आणि लेडी ऑफिसरने माझा गळा पकडला.

उत्तर प्रदेशात पोलिसांच्या दादागिरीला बळी पडलेल्या प्रत्येक नागरिकाबरोबर मी उभी आहे. तो माझा सत्याग्रह आहे. भाजप सरकार भ्याडपणा दाखवत आहे. मी उत्तर प्रदेशची प्रभारी आहे आणि मी उत्तर प्रदेशात कुठे जाईन याचा निर्णय भाजपा सरकार घेणार नाही.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2019 08:10 AM IST

ताज्या बातम्या