मराठी बातम्या /बातम्या /देश /

गोव्यात काँग्रेसची भविष्यातील राजकीय दिशा ठरणार; प्रियांका गांधींचा महत्त्वाचा दौरा

गोव्यात काँग्रेसची भविष्यातील राजकीय दिशा ठरणार; प्रियांका गांधींचा महत्त्वाचा दौरा

  'राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. मात्र राहुल गांधी यांना काही कारणास्थ राष्ट्रीय अध्यक्ष बनायचं नसेल तर ...'

'राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. मात्र राहुल गांधी यांना काही कारणास्थ राष्ट्रीय अध्यक्ष बनायचं नसेल तर ...'

या एक दिवशीय दौऱ्यात प्रियांका गांधी 1972 मध्ये इंदिरा गांधींनी स्वतः उद्घाटन केलेल्या इमारतीला भेट देणार (Priyanka Gandhi to visit Goa) आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : काँग्रेस नेत्या आणि सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) 10 डिसेंबर रोजी प्रथमच गोव्याला भेट देणार आहेत, या एक दिवशीय दौऱ्यात प्रियांका गांधी 1972 मध्ये इंदिरा गांधींनी स्वतः उद्घाटन केलेल्या इमारतीला भेट देणार (Priyanka Gandhi to visit Goa) आहेत. प्रियंकांच्या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घोषणा केली.

ते म्हणाले की, गोव्यातही खाण सुरू करण्याचा मुद्दा असून सध्याचे भाजप सरकार या मुद्द्यावर अपयशी ठरले आहे आणि केंद्र सरकारने यासाठी संसदेत विधेयक आणल्यास काँग्रेस पाठिंबा देईल. विशेष म्हणजे कालच गोव्यातील 21 सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपला उदरनिर्वाह वाचवण्याबाबत सांगितले होते आणि आता काँग्रेसने खाणकाम सुरू करण्यास उघडपणे पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, सरकार लवकरच 8 खाणींचा लिलाव करणार आहे, मात्र आधीपासून सुरू असलेल्या खाणी तातडीने सुरू कराव्यात, जेणेकरून लोकांना रोजगार मिळेल, अशी काँग्रेसची इच्छा आहे.

10 डिसेंबर रोजी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी गोव्यातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. गोवा काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज ही घोषणा केली. या भेटीत प्रियांका गांधी त्या सर्व लोकांना भेटणार आहेत, ज्यांना राज्यातील भाजप सरकारकडून न्याय मिळाला नाही, असेही ते म्हणाले. गोव्यातील खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी गोव्याच्या 21 सरपंचांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या अर्जाला उत्तर देताना कामत म्हणाले की, खाण क्षेत्रातील समस्या सोडवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घोषणेचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले, गोव्यात लवकरात लवकर खाणकाम सुरू व्हावे, अशी आमची इच्छा आहे. केंद्रातील भाजप सरकारने यासंबंधीचे कोणतेही विधेयक संसदेत आणल्यास काँग्रेस त्याला पूर्ण पाठिंबा देईल.

2018 पासून गोव्यात खाणकामावर पूर्णपणे बंदी आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनानंतर खाणकामाचा सर्वाधिक वाटा आहे. त्यावर घातलेल्या बंदीमुळे त्यावर अवलंबून असलेल्या सुमारे चार लाख लोकांची रोजीरोटी हिसकावून घेतली आहे. अलीकडेच गोव्यातील 21 सरपंचांनी पंतप्रधान मोदींना एक अर्ज लिहून गोव्यातील खाणकाम पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. 2013 मध्ये गोव्याने पंतप्रधानांना भाजपचे उमेदवार म्हणून नामांकन दिले होते आणि आता पंतप्रधानांनी रिटर्न गिफ्ट म्हणून गोव्यात खाणकाम पुन्हा सुरू करावे, असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

हे ही वाचा-Reliance चा ऐतिहसिक करार, TA’ZIZ सोबत करणार रसायनांची निर्मिती

गोव्यात खाणकाम हा एक मोठा आणि ज्वलंत प्रश्न आहे आणि त्यामुळेच प्रत्येक पक्ष त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे. आम आदमी पक्षानेही नुकतीच घोषणा केली होती की, सत्तेत आल्यास ते 6 महिन्यांत पुन्हा खाणकाम सुरू करेल. राज्यातील भाजप सरकारनेही आपण महामंडळ स्थापन करत असून लवकरच 6-8 खाण ब्लॉक्सचा लिलाव करून खाणकाम पुन्हा सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

गोव्यात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि भाजप खाणकामावरून आमने-सामने आहेत. 2012 मध्ये गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काँग्रेसवर 35000 कोटी लुटल्याचा आरोप करून त्याला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर ही रक्कम 300 कोटींपेक्षा जास्त नसल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले. प्रियंका गांधी यांच्या 10 डिसेंबरला होणाऱ्या दौऱ्यावर गोव्यातील काँग्रेसची भविष्यातील राजकीय दिशा ठरणार आहे.

First published:

Tags: Goa, Priyanka gandhi, काँग्रेस