Home /News /national /

प्रियंका गांधी आता नव्या घरात शिफ्ट होणार, गुरुग्रामला असेल नवा बंगला!

प्रियंका गांधी आता नव्या घरात शिफ्ट होणार, गुरुग्रामला असेल नवा बंगला!

भाजपाचे राष्ट्रीय प्रसारमाध्यम प्रमुख आणि राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांना हा बंगला मिळणार आहे.

    नवी दिल्ली 24 जुलै: काँग्रेसच्या(Congress) नेत्या आणि महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) आपल्या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. त्याचं नवं घर हे गुरुग्रामला (Gurugram) असणार आहे. DLF गोल्फ कोर्सच्या अरालियास इथं त्या राहायला जाणार आहेत. नवी दिल्लीतला त्यांचा बंगला खाली करण्याची नोटीस त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बंगला खाली केला आहे. त्यावरून देशभर वादही निर्माण झाला होता. नवी दिल्लीतल्या 35, लोधी इस्टेट इथे त्या गेली कित्येक वर्षांपासून राहत होत्या. ज्यांना SPG सुरक्ष आहे त्यांनाच या भागात सरकारी बंगल्यांमध्ये राहाता येतं. मात्र नव्या नियमांनुसार फक्त पंतप्रधानांनाच ही सुरक्षा असणार आहे. त्यामुळे त्यांना हा बंगला सोडावा लागणार आहे. रुग्रामच्या सेक्टर 42 मध्ये प्रियंका गांधी यांचं हे नवं घर आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांना 1 ऑगस्टपर्यंत लोधी इस्टेट येथील बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली होती. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पाठविलेल्या नोटीसनुसार प्रियंका गांधी 1 ऑगस्टनंतर या बंगल्यात राहू शकत नाहीत. दरम्यान, आता हा बंगला एका भाजप नेत्याला देण्यात आला आहे. Online Shopping करणाऱ्यांसाठी Good News, देशात लागू होणार नवे नियम; जाणून घ्या! भाजपाचे राष्ट्रीय प्रसारमाध्यम प्रमुख आणि राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांना हा बंगला मिळणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. प्रियंका गांधी वड्रा यांनी बंगला रिकामा केल्यानंतर अनिल बलुनी यांना त्याचा ताबा घेता येणार आहे. दरम्यान अनिल बलुनी यांनी स्वत: या बंगल्याची मागणी केली होती. अनिल बलुनी यांनी  या बंगल्याची मागणी केली होती, त्यानुसार केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडून त्यांना हा बंगला देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा बोलणार, मोठ्या घोषणेची शक्यता दरम्यान, प्रियंका गांधी यांना बंगला सोडण्यासाठी देण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, त्यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. या प्रणालीनुसार ज्यांना या प्रकारचं संरक्षण देण्यात येतं, त्यांना शासकीय निवास व्यवस्था दिली जात नाही. गांधी कुटुंबाची काढली होती एसपीजी सुरक्षा विशेष म्हणजे नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने केलेल्या आढाव्यानुसार गांधी कुटुंबाला कोणताही थेट धोका नसल्याचे समोर आले होते. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर माजी पंतप्रधानांनाही एसपीजी संरक्षण देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेतला जातो आणि आवश्यकतेनुसार कमी केला जातो. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षादेखील ऑगस्ट 2019 मध्ये हटविण्यात आली होती.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Priyanka gandhi

    पुढील बातम्या