मराठी बातम्या /बातम्या /देश /प्रियांका गांधी नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीतून लढणार ?

प्रियांका गांधी नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीतून लढणार ?

रायबरेलीमध्ये एका चर्चेच्या वेळी कार्यकर्ते प्रियांका गांघींना निवडणूक लढवण्याची गळ घालत होते. त्यावेळी, निवडणूक लढवायचीच असेल तर ती वाराणसीमधून का नको ? असा सवाल प्रियांका गांधींनी विचारला आणि लगेचच तर्क-वितर्कांना उधाण आलं.

  रायबरेली, २८ मार्च : प्रियांका गांधींनी सक्रिय राजकारणात एन्ट्री घेतल्यापासून त्या निवडणूक लढवणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्ते त्यांनी निवडणूक लढावी म्हणून त्यांना आग्रह करतायत.रायबरेलीमध्ये अशाच एका चर्चेच्या वेळी कार्यकर्ते त्यांना निवडणूक लढवण्याची गळ घालत होते. त्यावेळी, निवडणूक लढवायचीच असेल तर ती वाराणसीमधून का नको ? असा सवाल प्रियांका गांधींनी विचारला आणि लगेचच तर्क-वितर्कांना उधाण आलं.

  उत्तर प्रदेशात वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवतायत. म्हणूनच वाराणसीमध्ये मोदी विरुद्ध प्रियांका गांधी अशी लढत असणार का, असाही प्रश्न विचारला गेला. सोशल मीडियावर या चर्चेला आणखीनच वेग आला.

  आईचा प्रचार

  अमेठीमधून राहुल गांधी तर रायबरेलीमधून सोनिया गांधी निवडणूक लढवणार आहेत. आईच्या प्रचाराच्या वेळी प्रियांकांनी कार्यकर्त्यांशी बोलताना हे वक्तव्य केलं.

  Lok sabha election 2019 निवडणुकीच्या आजच्या सर्व बातम्या फक्त 'एका क्लिक'वर

  वाराणसीमधून नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेस आणि सपा- बसपा आघाडीने अजून उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळेच प्रियांका काँग्रेसतर्फे इथून मोदींना आव्हान देणार का, अशी चर्चा सुरू झाली.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा सामना रंगला होता. यात काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचं नाव एवढं पुढे आलं नव्हतं. पण या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं होतं.

  आणखी उमेदवार कोण ?

  आता यावेळी मोदींच्या विरोधात कोण याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.प्रियांका गांधी यावेळी काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. सपा-बसपाची आघाडी आणि सत्ताधारी भाजप यांच्याशी त्या कसा सामना करतात ते पाहावं लागेल.

  ====================================================================================================================================================

  VIDEO : सगळ्यांचा हिशेब मांडला जाईल; मेरठमध्ये मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

  First published:

  Tags: Lok sabha election 2019, Priyanka gandhi, Uttar Pradesh Lok Sabha Elections 2019, Varanasi