Elec-widget

नरेंद्र मोदींबद्दल मुलांचे अपशब्द; प्रियांका गांधींना नोटीस

नरेंद्र मोदींबद्दल मुलांचे अपशब्द; प्रियांका गांधींना नोटीस

मुलांनी नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरल्यानंतर प्रियांका गांधी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मे : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सध्या जोरदार प्रचार करत आहेत. गुरूवारी ( 02 मे ) अमेठीमध्ये असताना प्रियांका गांधींसमोर मुलांनी चौकीदार चोर है अशा घोषणा दिल्या. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द देखील वापरले. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला होता. त्यानंतर आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं प्रियांका गांधी यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, त्या व्हिडीओबद्दल बोलताना प्रियांकां गांधी यांना सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मुलांनी अपशब्द वापरल्यानंतर मी त्यांना तसं करण्यापासून रोखलं. भाजपनं आपल्या सोयीनं व्हिडीओ एटीड केल्याचं प्रियांका गांधी यांनी ANIसोबत बोलताना स्पष्ट केलं. त्यानंतर आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला प्रियांका गांधी काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.


Fani Cyclone : नागरिकांना मदतीचा हात द्या; राहुल गांधींचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश
भारतीय लष्कर – दहशतवाद्यांमध्ये चकमक; बुरहान वाणीच्या गँगमधील या दहशतवाद्याचा खात्मा?


काय आहे व्हिडीओमध्ये

प्रियांका गांधींसमोर मुलांनी चौकीदार चोर है! चौकीदार चोर है! अशा घोषणा दिल्या. पण, अचानकपणे मुलांनी आपल्या घोषणेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपशब्द वापरले. त्यावेळी प्रियांका गांधी यांनी मुलांना शांत राहण्यास सांगितले. शिवाय, अशा प्रकारची घोषणाबाजी अयोग्य असल्याचं प्रियांका गांधी यांनी मुलांना सांगितले. चौकीदर चोर है! ही घोषणा ठिक आहे. पण, अपशब्द वापरू नका. चांगली मुलं बना असा मोलाचा सल्ला यावेळी प्रियांका गांधी यांनी मुलांना दिला.

SPECIAL REPORT : उत्तर प्रदेशात मोदींना रोखण्यासाठी प्रियांका गांधी असा करताय प्रचार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 09:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...