एकही शब्द न बोलता प्रियांका गांधी दिल्लीत परतल्या!

प्रियांका मंगळवारी लखनऊत परतणार असल्या तरी 14 फेब्रुवारीला त्या माध्यांशी बोलणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 07:33 PM IST

एकही शब्द न बोलता प्रियांका गांधी दिल्लीत परतल्या!

लखनऊ 11 फेब्रुवारी : सोमवारचा दिवस हा खऱ्या अर्थाने प्रियांका गांधी यांचा होता. सक्रिय राजकारणात आल्यानंतर त्यांनी लखनऊत रोड शो करून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. पाच तासांचा रोड शो केला. कार्यक्रम झाल्यानंतर फक्त राहुल गांधी यांनीच भाषण केलं. प्रियांका एक शब्दही न बोलता दिल्लीत परतल्या त्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली.


दिवसभर चाललेल्या रोड शो नंतर सर्व कार्यकर्त्यांच लक्ष लागलं होतं ते प्रियांका गांधी यांच्या भाषणाकडे. राहुल यांनी जोषात भाषण करत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. त्यानंतर प्रियांका बोलतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती मात्र त्यांनी भाषण केलं नाही. त्या उद्या लखनऊत परतणार असल्या तरी 14 फेब्रुवारीला त्या माध्यांशी बोलणार असल्याची माहिती देण्यात आलीय.


राहुल गांधी काय म्हणाले?

Loading...


लखनऊत जोषात झालेल्या रोड शो नंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलीय. प्रत्येक राज्यात काँग्रेस आता फ्रंटफूटवर खेळणार आहे. भाजपच्या विचारधारेला काँग्रेस हरवणार आहे, पक्ष बॅकफूटवर खेळणार नाही असंही त्यांनी सांगितलं. स्थानिक नेत्यांना प्राधान्य देणं ही तुमची जबाबदारी  आहे अशी सूचनाही त्यांनी प्रियंका आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना केली.


नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात 30 हजार कोटी रुपये लुटले असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. चौकिदार चौर है असंही ते म्हणाले. मोदींचा पोकळपणा आता उघड झाला आहे.काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशचा कायापालट करण्यासाठी लढणार असंही ते म्हणाले.


लखनऊतल्या शक्ती प्रदर्शनाच्या आधी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एक भावुक पोस्ट करत प्रियांकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची सेवा करणं हे प्रियांकाचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत असं रॉबर्ट वाड्रा यांनी लिहिलं आहे.


VIDEO : आकाश अंबानींच्या लग्नाची पत्रिका सिद्धिविनायकाच्या चरणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...