नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : सध्या काँग्रेस अध्यक्षाचा विषय खूप चर्चेत आहे. सोनिया गांधींनंतर काँग्रेस अध्यक्षपद कोणाला सोपविणार याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षाच्या पदावरुन राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधींनी काही काळासाठी जबाबदारी घेतली असली तरी आता काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याचा शोध सुरू झाला आहे.
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी येत्या काळात पक्षाची जबाबदारी सांभाळण्यास नकार दिला आहे. त्या म्हणाल्या की उत्तर प्रदेशात पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रिय करणार आहे. त्या पुढे म्हणाल्या, माझ्यासाठी माझा भाऊ लीडर आहे व तोच नेहमी राहील. त्या पुढे म्हणाल्या, भाजपविरोधात लढण्यासाठी उत्तर प्रदेश आणि देशातील दुसऱ्या भागातील शेकडो लोक सक्षम आहेत. ते युवा नेतादेखील आहेत. भविष्यात काय होईल हे मी सांगू शकत नाही. मात्र पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी अनेक लोक सक्षम आहेत. त्या पुढे म्हणाल्या की गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये कोणीच माझ्या भावाप्रमाणे मोदींविरोधात लढा दिला नसेल.
राहुलशी सहमत – प्रियांका गांधी
प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या भावाने दिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात लिहिले होते की तो निवडणुकीची जबाबदारी घेत आहे. त्यानंतर त्यांनी लिहिले होते की गांधी घराण्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीने काँग्रेस अध्यक्ष व्हायला हवं.