नवी दिल्ली, 04 जुलै : लोकसभा निवडणुकीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. अध्यक्ष म्हणून काँग्रेसची सेवा करता आली ही गोष्ट माझ्यासाठी सन्मानाची होती. देश आणि पक्षाकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे, असं ट्विट देखील राहुल गांधी यांनी केलं. राहुल यांच्या राजीनाम्यानंतर प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. खूप कमी लोकांकडे असा निर्णय घेण्याचं धाडस असतं. तुमच्या निर्णयांचं मी स्वागत करते, अशा शब्दात प्रियांका गांधी यांना राहुल यांचं ट्विट रिट्विट केलं आहे. राहुल यांच्यानंतर प्रियांका यांनी अध्यक्षपद स्वीकारावं म्हणून काँग्रेसमधून आग्रह होता. पण, प्रियांका गांधी यांनी मात्र त्याला नकार दिला. शिवाय, राहुल यांनी देखील काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील असावा असं म्हटलं होतं.
Few have the courage that you do @rahulgandhi. Deepest respect for your decision. https://t.co/dh5JMSB63P
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 4, 2019
पोलिसांना जे जमले नाही ते TikTokमुळे शक्य, जया प्रदांच्या पतीचा लागला शोध!
काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण?
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवा अध्यक्ष कोण? यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचं नाव निश्चित झालं असून केवळ औपचारिक घोषणा होणं बाकी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव देखील आघाडीवर होतं. पण, सुशिलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असावा असा देखील अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
SPECIAL REPORT : मुंबईची लाईफलाईन झाली मृत्यूचा सापळा; गर्दीमुळे 3 जखमी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Priyanka gandhi, Rahul gandhi