News18 Lokmat

नीरव मोदीच्या अटकेनंतर प्रियांका गांधींनी विचारला हा प्रश्न

नीरव मोदीच्या अटकेनंतर आता विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. प्रियांका गांधी - वाड्रा यांनी देखील सरकारला खोचक सवाल केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 11:16 AM IST

नीरव मोदीच्या अटकेनंतर प्रियांका गांधींनी विचारला हा प्रश्न

नवी दिल्ली, 21 मार्च : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत लोकसभा निवडणुकीसाठी खेळलेली ही चाल असल्याची टीका करायला सुरूवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी - वाड्रा यांनी देखील नीरव मोदीच्या अटकेबाबत लंडनला जायला कुणी दिलं? असा खोचक सवाल केला आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी देखील नीरव मोदीला लोकसभा निवडणुकांकरता भारतात आणलं जाईल आणि निवडणुकांनंतर पुन्हा पाठवलं जाईल अशी टीका सरकारवर केली आहे. त्यामुळे नीरव मोदीच्या अटकेवरून देखील आता आरोप - प्रत्यारोप रंगले आहेत. जुलै 2018मध्ये नीरव मोदीच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.


लंडनमध्ये अटक

लंडनच्या कोर्टाने घोटाळेबाज नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्याला 29 मार्चपर्यंत कोठडीतच राहावं लागणार आहे. पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. बुधवारी ( 20 मार्च ) कोर्टातही हजर करण्यात आलं होतं. त्यावर आपल्याला जामीन मिळावा अशी याचिका नीरव मोदीने केली होती. पण, त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने टाकलेल्या दबावानंतर इंग्लंडने ही कारवाई केली आहे.


Loading...

5 वर्षांत 2 कोटी पुरुष बेरोजगार झाले, 'NSSO' चा धक्कादायक रिपोर्ट

भारतीय बँकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.

13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये अगदी मुक्तपणे फिरत असल्याचा एक व्हिडिओ 'द टेलिग्राफ' या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केला होता. तसेच नीरव मोदीला आम्ही शोधलं असून तो 'वेस्ट एन्ड लंडन'मध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचा दावा टेलिग्राफनं केला होता.


VIDEO: होळीमध्ये मसूद अझहरचा 25 फुटांचा पुतळा जाळून शहिदांना श्रद्धांजली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 10:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...