अखिलेश यांना नाराज करणं प्रियांका गांधींना परवडेल का ?

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी मायावती आणि अखिलेश यादव यांना धक्के देण्यासाठी नवी तंत्रं आजमावतायत. त्यांनी शिवपाल यादव यांची भेट घेतल्यानंतर आता नवी समीकरणं जुळणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 08:09 PM IST

अखिलेश यांना नाराज करणं प्रियांका गांधींना परवडेल का ?

लखनौ, 15 मार्च : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी मायावती आणि अखिलेश यादव यांच्या महागठबंधनला धक्के देण्यासाठी नवी तंत्रं आजमावतायत. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशखेखर आझाद यांची भेट घेऊन त्यांनी मायावतींना धक्का दिला आणि त्यानंतर शिवपाल यादव यांच्याशी चर्चा करून अखिलेश यादव यांनाही आव्हान दिलं.

या भेटीगाठींनंतर उत्तर प्रदेशमधली समीकरणं बदलताना दिसतायत. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुलायमसिंह यादव यांच्या पक्षातून बाहेर पडलेले शिवपाल यादव आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.

शिवपाल यादव आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचीही चर्चा झाली.याबदद्लची घोषणा प्रियांका गांधी लवकरच करू शकतात. लखनौमधल्या सभेत ही घोषणा करायचं त्यांनी ठरवलं होतं पण कार्यक्रमात बदल झाल्याने आता सोमवारी त्या ही घोषणा करतील, असं असं बोललं जातं.

अखिलेश यादव यांचं काँग्रेसमधलं काहिसं मवाळ धोरण आहे पण शिवपाल यादव आणि काँग्रेसची युती झाली तर सपा आणि काँग्रेसचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी जिथून निवडणूक लढवतील तिथे समाजवादी पक्ष आपला उमेदवार उभा करणार नाही, असा समझौता अखिलेश यादव आणि काँग्रेसमध्ये झाला आहे. काँग्रेसवर कठोर टीका करणाऱ्या मायावतींची विधानंही अखिलेश यादव यांनी फेटाळली आहेत. या स्थितीत काँग्रेस अखिलेश यादव यांची नाराजी पत्करणार का, हा खरा प्रश्न आहे.

Loading...

प्रियांका गांधी यांच्यावर पक्षाने पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने प्रियांका गांधी किती जणांना काँग्रेससोबत जोडू शकतात यावरच त्यांचं यश अवलंबून आहे.

=====================================================================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...