चंद्रशेखर आझाद यांना भेटल्या प्रियांका गांधी, मोदींना देणार आव्हान ?

चंद्रशेखर आझाद यांना भेटल्या प्रियांका गांधी, मोदींना देणार आव्हान ?

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मेरठ हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. याच चंद्रशेखर आझाद यांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मार्च : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मेरठ हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

याच चंद्रशेखर आझाद यांनी नरेंद्र मोदींचा वाराणसीमधून पराभव करण्याचा चंग बांधला आहे. सपा आणि बसपाने वाराणसीमधून समर्थ उमदेवार दिला नाही तर आपण स्वत: मोदींवरुद्ध लढू, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

मुझफ्फरनगरमध्ये एक मोटरसायकल रॅली काढण्याच्या तयारीत असताना चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आणि आजारी पडल्यामुळे त्यांना मेरठच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

हुंकार रॅलीला परवानगी नाकारली

चंद्रशेखर आझाद यांनी मेरठमधल्या हुंकार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला होता. ही रॅली मेरठहून निघून 15 मार्चला दिल्लीला पोहोचणार होती.

उत्तर प्रदेशमधल्य दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रियांका गांधींनी चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतल्याचं बोललं जातंय. मायावतींनी काँग्रेसशी आघाडी करण्याचं नाकारल्यामुळे प्रियांका गांधींनात्यांच्याविरुद्ध चंद्रशेखर आझाद यांची मदत घ्यायची आहे, असंही सूत्रांनी सांगितलं.

याआधी, चंद्रशेखर आझाद यांच्याशी News 18 ने बातचीत केली.

प्रियांका गांधी ट्विटरवर 'या' 7 लोकांना करतात फॉलो

आम्ही मेरठहून निघणाऱ्या रॅलीसाठी पोलिसांची परवानगी घेतली होती पण राज्य सरकारने ही परवानगी नाकराली आणि याबदद्ल आम्हाला काहीही सांगितलं नाही, असं ते म्हणाले. आपण दिल्लीमध्ये 15 मार्चला सभा घेणार आहोत, असंही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्यासोबतच स्मृती इराणी यांच्या अमेठीमध्येही आम्ही उमेदवार उभा करू, असं चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे. प्रियांका गांधी यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे आता नवी राजकीय समीकरणं जुळणार का याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

======================================================================================

First published: March 13, 2019, 6:20 PM IST

ताज्या बातम्या