मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रियांका गांधी रायबरेलीमधून लढणार का लोकसभेची निवडणूक?

प्रियांका गांधी रायबरेलीमधून लढणार का लोकसभेची निवडणूक?

प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातल्या एंट्रीने देशाच्या राजकारणात खळबळ उडालीय. लोकांना कायम प्रियांकांमध्ये इंदिरा गांधींची प्रतिमा दिसते. कणखर आणि जनमत संघटीत करण्याचा करिष्मा असलेल्या प्रियांका गांधी यांची प्रेम कहाणीही तेवढीच लक्षवेधी आहे.

प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातल्या एंट्रीने देशाच्या राजकारणात खळबळ उडालीय. लोकांना कायम प्रियांकांमध्ये इंदिरा गांधींची प्रतिमा दिसते. कणखर आणि जनमत संघटीत करण्याचा करिष्मा असलेल्या प्रियांका गांधी यांची प्रेम कहाणीही तेवढीच लक्षवेधी आहे.

प्रियांका रायबरेलीमधून लढल्यास त्याचा इतर काही जागांवर काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली 23 जानेवारी : प्रियांका गांधी यांच्या राजकारणातल्या एंट्रीने देशाचं राजकीय समिकरण बदलणार आहे. तर उत्तर प्रदेशात सर्वच पक्षांना आपल्या धोरणांची फेरआखणी करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशात रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे दोन पारंपरिक मतदार संघ आहेत. यातल्या रायबरेलीमधून प्रियांका लोकसभेसाठी लढणार का असा प्रश्न आता विचारला जातोय.

सोनिया गांधी या आजरपणामुळे आता राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत त्यांना अपवाद वगळता प्रचारही केला नाही. त्यामुळं त्या 2019 ची लोकसभा निवडणुक लढणार नाहीत अशी शक्यता आहे.

तर त्यांच्या रायबरेली या मतदार संघातून प्रियांका गांधी लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेली अनेक वर्ष काँग्रेसचे कार्यकर्ते प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावं यासाठी आग्रह करत होते. प्रियांकाच्या राजकारण प्रवेशामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. तसच त्या रायबरेलीमधून लढल्यास त्याचा इतर काही जागांवर काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात या आधी समाजवादी पक्ष आणि बसपाची आघाडी झाली होती. त्यामुळे मुस्लिम, दलित आणि यादव मतदारांचं ध्रुविकरण होणार असा अंदाज बांधला जात होता. त्याचा फटका काँग्रेसलाच बसला असता. त्यामुळे तातडीने पावलं टाकत काँग्रेसने प्रियांका गांधी यांनी पूर्व उत्तर प्रदेशची कमान दिली.

भाजपकडून योगी आदित्यनाथ यांच्याकडे नेतृत्व असल्याने त्यांच्या उग्र हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना पुढे केलं अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: #rahulgandhi, Congress, Priyanka gandhi, Uttar pradesh, Yogi Aadityanath, प्रियांका गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी