नवी दिल्ली, 14 मे : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार अशी चर्चा सुरु होती. पण, अखेरपर्यंत प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या नाहीत. पण आता लोकसभा निवडणुकांच्या निकाल लागल्यानंतर प्रियांका गांधी निवडणूक लढवतील अशी दाट शक्यता आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवली आहे. पण, दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यास राहुल गांधी यांना एक जागा सोडावी लागेल. अशा स्थितीमध्ये राहुल गांधी अमेठीतून राजीनामा देतील. त्यानंतर त्यांच्या जागी प्रियांका गांधी अमेठीतून लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 'हिंदुस्थान टाईम्स'शी बोलताना प्रियांका गांधी यांनी तसे संकेत दिले आहेत.
'शेवटच्या 48 तासात मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळली'
वाराणसीबद्दल होती चर्चा
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यापूर्वी वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणार अशी चर्चा होती. त्यानंतर मात्र काँग्रसनं यावर स्पष्टीकरण देत बातमीचा इन्कार केला होता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियांका गांधी यांना सक्रीय राजकारणात उतरवत काँग्रेसनं मास्टर स्ट्रोक मारला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह दिसून आला. प्रियांका गांधी यांनी झंझावती प्रचार करत नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. त्यांचा धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. पण, आता पोटनिवडणुकीमध्ये प्रियांका गांधी अमेठीमधून लढणार का? दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यास राहुल गांधी कोणती जागा सोडणार हे पाहावं लागणार आहे.
VIDEO: निकालाआधी अमित शहांनी सहकुटुंब घेतलं सोमनाथाचं दर्शन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Lok sabha election 2019, Priyanka gandhi