वाराणसी, 15 मे : वाराणसीतील आयोजित रोड शोमध्ये प्रियंका गांधींच्या डोक्याला दुखापत झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. रोड शोच्या ट्रकमधून एक कार्यकर्ता खाली पडला. त्याला बघण्यासाठी प्रियंका खाली उतरल्या. पण परत वर चढताना ट्रकचा रॉड त्यांच्या डोक्याला लागला. पण दुखापत होऊनही प्रियंका गांधी यांनी रोड शो सुरूच ठेवला.
Varanasi: Congress General Secretary for eastern UP, Priyanka Gandhi Vadra pays tribute to Pandit Madan Mohan Malviya at Banaras Hindu University gate. pic.twitter.com/UiRl5Yov3X
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांनी दुखापत झालेली नाही. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे. मोदींच्या वाराणसीमध्ये प्रियंका गांधी यांनी रोड शोचं आयोजन केलं होतं. यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे रोड शोदरम्यान मोठ्या संख्येनं नागरिक येणं ही एकीकडे काँग्रेससाठी चांगली गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसला वाराणसीमध्ये असा भव्य रोड शो पार पाडता आला नाही. त्यामुळे प्रियांका गांधींच्या रॅलीची मोठी चर्चा आहे.
दरम्यान, या सभेठिकाणी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सभेच्या मंडपाची मोडतोड झाली. अनेक खुर्च्याही दूर फेकल्या गेल्या. सुदैवानं यात कुणी जखमी झालं नाही. त्यानंतरही रोड शोला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली.
'संघा'च्या लोकांनी ब्रिटिशांची फक्त चमचेगिरी केली - प्रियंका गांधी
खरंतर, लोकसभेच्या निवडणुकीचा आता फक्त शेवटचा टप्पा राहिला आहे. मतदानाला अवघे काही दिवस राहिले असताना सर्वच नेत्यांनी प्रचारात आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पंजाबमधल्या प्रचारसभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पंजाब प्रखर आंदोलन करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे ब्रिटिशांची चमचेगीरी करत होते असा आरोप त्यांनी केला होता.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान काय असा प्रश्न काँग्रेसकडून कायम विचारला जातो. तर संघाच्या लोकांनी स्वातंत्र चळवळीत सहभाग घेतला होता असं उत्तर संघ परिवाराकडून कायम दिलं जातं. याही निवडणुकीत तो मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला.
वाराणसीमध्ये मोदींचा झंझावाती प्रचार
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झंझावाती प्रचार केला. गेल्या काही महिन्यांत त्यांनी वेगवेगळ्या राज्यांत 200 कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांचा हा प्रचार पाहिला तर मोदींनी 125 दिवसांत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत पिंजून काढला आणि ते जवळजवळ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचले, असं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
विद्यार्थ्यांपासून ते शास्त्रज्ञ, शेतकरी, उद्योजक, परदेशी प्रमुख, राजकीय कार्यकर्ते अशा वेगवेगळ्या लोकांशी त्यांनी संवाद साधला.
वाराणसीला 5 वेळा भेट
या 125 दिवसांत मोदींनी वाराणसी मतदारसंघाला पाच वेळा भेट दिली आणि तिथेही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. वाराणसीमध्ये पायाभूत सुविधा, वीजपुरवठा आणि स्वच्छता यावर भर दिला.
कुंभमेळ्यामध्ये स्वच्छता कामगारांचे पाय धुणारे पंतप्रधान कुणीही विसरू शकत नाही, असंही या वेबसाइटवर म्हटलं आहे.
मोदींच्या या प्रचंड व्यग्र वेळापत्रकात लांब पल्ल्याचा हवाई प्रवास, हेलकॉप्टरच्या सफरींचा समावेश आहे.मोदींचा दिवस लवकर सुरू होऊन उशिरा संपत असे. पण लोकांशी संवाद साधण्यात एक वेगळाच आनंद होता,असं मोदींचं म्हणणं आहे.
ममतादीदी, हा मोदी तुम्हाला घाबरत नाही, कोलकात्यातून UNCUT भाषण