News18 Lokmat

फक्त 7 व्यक्ती ज्यांना प्रियांका गांधी फॉलो करतात

प्रियांका गांधी यांनी मात्र राजकारणाच्या मैदानात उतरताच सोशल मीडियावर प्रवेश केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 02:15 PM IST

फक्त 7 व्यक्ती ज्यांना प्रियांका गांधी  फॉलो करतात

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता सोशल मीडियावर देखील पदार्पण केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर फार उशिराने प्रवेश केला होता. याउलट प्रियांका गांधी यांनी मात्र राजकारणाच्या मैदानात उतरताच सोशल मीडियावर प्रवेश केला आहे.

प्रियांका यांनी सोमवारी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट twitterवर प्रवेश केला. प्रियांका गांधी यांनी ट्विटर अकाऊंवटर प्रियांका गांधी वाड्रा असं नाव ठेवलं आहे. तसंच त्यांचं अकाऊंट व्हेरिफाईडही करण्यात आलं आहे. @Priyanka Gandhi Vadra या ट्विटर अकाऊंटवर तुम्ही प्रियांका यांना फॉलो करू शकता.

सोशल मीडियाचं महत्त्व वाढत असल्याने राजकारण्यांनाही त्याची दखल घ्यावी लागत आहे. twitter प्रवेश केल्यानंतर प्रियांका यांनी 7 जणांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अधिकृत खाते, सचिन पायलट, अशोक गेहलोत, अहमद पटेल, रणदीप सिंग सुरजेनवाल आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश आहे.

प्रियांका गांधींचा उत्तर प्रदेशात रोड शो

प्रियांका गांधी पहिल्यांदाच युपी दौऱ्यावर जात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राज्याच्या पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हे देखील असणार आहेत.

Loading...

संबंधित बातमी:


प्रियांकांच्या एन्ट्रीनंतर सपा-बसपा बॅकफूटवर; आता दिली इतक्या जागांची ऑफर


राजकारणासोबतच सोशल मीडियातही प्रियंका गांधींचा धमाका, 'इथे' करा फॉलो


UPSC नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; पाहा हा सुपरफास्ट VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...