S M L

राजकारणासोबतच सोशल मीडियातही प्रियंका गांधींचा धमाका, 'इथे' करा फॉलो

उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच युपी दौऱ्यावर जात आहेत. त्याआधी त्यांनी ट्विटरवर एंट्री केली आहे.

Updated On: Feb 11, 2019 12:22 PM IST

राजकारणासोबतच सोशल मीडियातही प्रियंका गांधींचा धमाका, 'इथे' करा फॉलो

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात एंट्री केल्यानंतर आता ट्विटरवरही पदार्पण केलं आहे. सोशल मीडियाचं महत्त्व वाढत असल्याने राजकारण्यांनाही त्याची दखल घ्यावी लागत आहे.

उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच युपी दौऱ्यावर जात आहेत. त्याआधी त्यांनी ट्विटरवर एंट्री केली आहे. ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून नेते आपली अधिकृत भूमिका मांडत असतात.

प्रियंका गांधी यांनी ट्विटर अकाऊंवटर प्रियंका गांधी वाड्रा असं नाव ठेवलं आहे. तसंच त्यांचं अकाऊंट व्हेरिफाईडही करण्यात आलं आहे. @Priyanka Gandhi Vadra या ट्विटर अकाऊंटवर तुम्ही प्रियंका यांना फॉलो करू शकता.

https://twitter.com/priyankagandhi

प्रियंका गांधींचा उत्तर प्रदेशात रोड शो

Loading...

प्रियंका गांधी पहिल्यांदाच युपी दौऱ्यावर जात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राज्याच्या पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील असणार आहेत.

काँग्रेसचे हे तीन मोठे नेते उत्तर प्रदेशात येणार असल्याने त्यांचं भव्य स्वागत करण्याचं प्रदेश काँग्रेसने ठरवलं आहे. हे तीन्ही नेते युपीमध्ये रोड शोदेखील करणार आहेत. प्रियंका यांची युपीच्या राजकारणातील एंट्री काँग्रेससाठी किती फायद्याची ठरणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रियंका यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशानंतर भाजपने याचा काहीही परिणाम होणार नाही असं म्हटलं आहे. पण भाजपचे अनेक नेते प्रियंका यांच्यावर टीका करत आहेत. प्रियंका यांच्या एंट्रीनंतर भाजप घाबरली आहे आणि त्यातूनच प्रियंका यांच्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता प्रियंका गांधी युपीत दाखल झाल्यानंतर भाजपही अलर्ट झाली असणार आहे.

कारण उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती यांनी आघाडी केल्याने भाजपला मोठा फटका बसणार आहे, अशी शक्यता अनेक सर्वेतून समोर येत आहे. अशातच आता प्रियंकाच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशामुळे भाजपला युपीतील जागा राखण्यासाठी आणखीच मोठी कसरत करावी लागेल.

कसा असेल प्रियंका गांधी यांचा युपी दौरा?

उत्तर प्रदेशात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे तिन्ही नेते लखनौच्या काँग्रेस मुख्यालयात जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतील. राहुल गांधी आजच दिल्लीला परतण्याची शक्यता असून, प्रियंकाचा दौरा मात्र चार दिवसांचा आहे. लखनौमध्ये प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य शिंदे 12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा असून, त्यातील 42 जागांची जबाबदारी प्रियंका गांधींकडे आहे. प्रियंका आणि ज्योतिरादित्य शिंदे प्रत्येक मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना भेटून तेथील स्थिती जाणून घेणार आहेत. उत्तरेच्या पूर्व भागातील वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असून, तेथे प्रियंका यांचा लोकसभा निवडणुकीत किती प्रभाव पडतो याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.


पंकजा आणि धनंजय एका मंचावर आले खरे पण...दोघांमध्ये रंगली जुगलबंदी, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 12:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close