नवी दिल्ली, 23 जानेवारी: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधी यांची नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही महत्त्वाची खेळी मानली जाते. प्रियांका यांच्या या नियुक्तीबद्दल काँग्रेस नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहेच. पण भाजपचा मित्र असलेला आणि केंद्रात तसेच महाराष्ट्रात त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने प्रियांका यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशाचे स्वागत केले आहे.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रियांका यांचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रियांका गांधी यांच्या राजकीय प्रवेशाचे स्वागत केले आहे. उत्तर प्रदेश सारख्या महत्त्वाच्या राज्यात प्रियांका गांधी यांना जबाबदारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा फायदा होईल अशी प्रतिक्रिया राजीव सातव यांनी दिली आहे.
प्रियांका गांधी यांचा राजकारणात प्रवेश, राहुल गांधींनी दिली 'ही' जबाबदारी
संबंधित बातमीन्यूज18 लोकमत Exclusive : नारायण राणेंची अनकट मुलाखत