'मी 47 वर्षं दिल्लीत राहते, तुम्ही 5 वर्षांपूर्वी आलात', प्रियांका गांधींचं मोदींना खुलं आव्हान

'मी 47 वर्षं दिल्लीत राहते, तुम्ही 5 वर्षांपूर्वी आलात', प्रियांका गांधींचं मोदींना खुलं आव्हान

नरेंद्र मोदी हे दिल्लीला फक्त पाच वर्षांपूर्वी आले पण माझा जन्मच दिल्लीत झाला आहे आणि गेली 47 वर्षं मी दिल्लीतच राहते आहे, असं खुलं आव्हान प्रियांका गांधींनी मोदींना दिलं आहे.

  • Share this:

दिल्ली, 8 मे : नरेंद्र मोदी हे दिल्लीला फक्त पाच वर्षांपूर्वी आले पण माझा जन्मच दिल्लीत झाला आहे आणि गेली 47 वर्षं मी दिल्लीतच राहते आहे, असं प्रियांका गांधींनी दिल्लीतल्या प्रचारात मोदींना उद्देशून म्हटलं आहे. मोदींच्या खोट्या आश्वासनांमुळे दिल्लीकर वैतागले आहेत. म्हणूनच मी दिल्लीची मुलगी या नात्याने मोदींना आव्हान करते की त्यांनी नोटबंदी, GST आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर शेवटच्या दोन टप्प्यांतली निवडणूक लढवून दाखवावी, असं त्या म्हणाल्या.

दिल्ली के दिल की बात

मला 'दिल्ली के दिल की बात' म्हणजेच दिल्लीच्या लोकांच्या मनातली गोष्ट माहीत आहे, असंही त्यांनी म्हटलं आणि नरेंद्र मोदींना खुलं आव्हान दिलं.

याआधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी राजीव गांधींच्या नावावर मतं मागून दाखवावी, असं आव्हान मोदींनी केलं होतं. त्याला प्रियांका गांधींनी त्याच शब्दात उत्तर दिलं आहे.

आक्रमक प्रचार

प्रियांका गांधी लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यांमध्ये आक्रमक प्रचार करत आहेत. हरियाणामधल्या सभेमध्ये त्यांनी मोदींचा उल्लेख दुर्योधन असा केला आणि एक कविताही वाचून दाखवली. बेरोजगारी, नोटबंदी या मुद्दयांवरून प्रियांकांनी मोदींना चांगलंच लक्ष्य केलं आहे.

भ्रष्टाचारी नंबर 1

नरेंद्र मोदींनी राजीव गांधींचा उल्लेख भ्रष्टाचारी नंबर 1 असा केल्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे. प्रियांका गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं हे वाक्युद्ध आपल्याला शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळतं आहे.

राजधानीत सामना

दिल्लीमधल्या सातही जागांसाठी 12 मे ला सहाव्या टप्प्यातलं मतदान होतं आहे.भाजप, काँग्रेस आणि आप अशा तिरंगी लढती दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राजधानीमध्ये प्रियांका विरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना पाहायला मिळाला.

प्रियांकांच्या या टिकेवर आता मोदी किंवा भाजपचे नेते काय उत्तर देतात हे पाहावं लागेल.

================================================================================

VIDEO : पंतप्रधान मोदी मास्टर ठग, दिग्विजय सिंहांची जीभ घसरली

First published: May 8, 2019, 7:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading