मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रियंका गांधींची नवी खेळी! इंटर पास मुलींना स्मार्टफोन, तर पदवीधर युवतींना इलेक्ट्रिक स्कूटी

प्रियंका गांधींची नवी खेळी! इंटर पास मुलींना स्मार्टफोन, तर पदवीधर युवतींना इलेक्ट्रिक स्कूटी

जवळपास तीन दशकं उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या निम्म्या म्हणजेच तरुण मतदारांना (Young Voters) आकर्षित करून घेण्यासाठी काँग्रेसने अशी घोषणा केली

जवळपास तीन दशकं उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या निम्म्या म्हणजेच तरुण मतदारांना (Young Voters) आकर्षित करून घेण्यासाठी काँग्रेसने अशी घोषणा केली

जवळपास तीन दशकं उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या निम्म्या म्हणजेच तरुण मतदारांना (Young Voters) आकर्षित करून घेण्यासाठी काँग्रेसने अशी घोषणा केली

लखनऊ 21 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातल्या आगामी म्हणजेच 2022 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे (Congress) उभ्या केल्या जाणार असलेल्या उमेदवारांमध्ये 40 टक्के महिला उमेदवारांना संधी दिली जाईल, अशी घोषणा काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी अलीकडेच केली होती. आता त्यांनी आणखी एक घोषणा केली आहे. 2022मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसचं (UP Assembly Election) सरकार सत्तेत आल्यास इंटर पास झालेल्या मुलींना स्मार्टफोन (Smartphone) दिला जाईल आणि पदवीधर झालेल्या युवतींना इलेक्ट्रिक स्कूटी (Electric Scooty) दिली जाईल, अशी माहिती प्रियांका गांधी यांनी ट्विट करून दिली आहे.

जवळपास तीन दशकं उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या निम्म्या म्हणजेच तरुण मतदारांना (Young Voters) आकर्षित करून घेण्यासाठी काँग्रेसने अशी घोषणा करून एक मोठी खेळी खेळली आहे आणि विरोधी पक्षांना आव्हान दिलं आहे.

'नवनीत राणांसह 5 खासदार बनावट जात प्रमाणपत्रावर लोकसभेत' माजी CMचा दावा

प्रियांका गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे, 'काल मी काही विद्यार्थिनींना भेटले. त्यांनी सांगितलं, की त्यांना शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी स्मार्टफोनची गरज आहे. त्यानंतर घोषणा समितीच्या सहमतीने उत्तर प्रदेश काँग्रेसने घेतलेला निर्णय जाहीर करण्यात मला आनंद होत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यावर इंटर पास मुलींना स्मार्टफोन आणि पदवीधर युवतींना इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल.'

19 ऑक्टोबरला प्रियांका गांधींनी (Priyanka Gandhi) लखनऊमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात त्यांनी घोषणा केली होती, की काँग्रेस पक्षाकडून यावेळी 40 टक्के तिकिटं महिला उमेदवारांना दिली जातील. या निर्णयामुळे अधिक महिलांना राजकारणात संधी मिळेल आणि उत्तर प्रदेशचा विकास वेगाने होऊ शकेल. प्रियांका गांधींचा हा निर्णयही विरोधी पक्षांसाठी (Opposition Parties) एक प्रकारे आव्हानात्मक मानला जात आहे.

'आज होगा जश्न', भारत देश कोरोना लसीकरणात बनवणार नवा रेकॉर्ड

प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातल्या जवळपास साडेतीन कोटी महिलांच्या व्होट बँकेला (Women Vote Bank) आकर्षित करून घेण्याचं गणित मांडत आहेत. स्मार्टफोन आणि स्कूटीचं आश्वासन देऊन त्यांनी पुन्हा एकदा तरुण महिलांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 2022मध्ये जी तरुण लोकसंख्या मतदान करील, अशी अपेक्षा आहे, त्यांना या आश्वासनातून काँग्रेस पक्षाकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे.

उत्तर प्रदेशात जवळपास तीन दशकं काँग्रेस सत्तेपासून दूर आहे. तसंच राष्ट्रीय पातळीवरही 2014पासून काँग्रेसची वाताहत झाली आहे. त्यामुळे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर पक्षाने लक्ष केंद्रित केलं आहे. उत्तर प्रदेश जिंकल्यास केंद्रातली सत्ता मिळवण्याचा मार्ग सोपा होतो, असं एक ढोबळ गणित आहे. ते गणित सोडवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे.

First published:

Tags: Priyanka gandhi, Uttar pradesh