2019मध्ये रायबेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती

2019मध्ये रायबेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती

आगामी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून सोनिया गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी उभ्या राहतील, अशी बातमी सूत्रांकडून मिळतेय.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 आॅगस्ट : आगामी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून सोनिया गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी उभ्या राहतील, अशी बातमी सूत्रांकडून मिळतेय. यामागे 2 कारणं सांगितली जात आहेत. एक तर सोनिया गांधींची प्रकृती हल्ली फारशी बरी नसते, आणि दुसरं म्हणजे पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रियांकांनी निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करावं, अशी काँग्रेसमधल्या अनेकांची इच्छा आहे.

हेही वाचा

फारुख अब्दुलांच्या घरात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकांनी कार चालकाला केलं ठार

रिक्षा चालक होणार पिंपरी चिंचवडचे नवे महापौर, पहा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

Birthday Special : ही ऐका किशोर कुमार यांची सदाबहार गाणी

भाजप 2019च्या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशाकडे गंभीरपणे पाहतंय. त्यामुळेच काँग्रसनं आपली तयारी सुरू केलीय. भाजपचं लक्ष अमेठी आणि रायबरेलीवर आहे. तो गड त्यांना काबीज करायचा आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता राखली. भाजपच्या विजयामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा धक्का मानला गेला. तेव्हापासून काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा प्रियांका गांधी यांची मागणी होत आहे. या पराभवानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या गोटात पुन्हा प्रियांका गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू झालीये. काँग्रेसचे नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी यांना प्रियांका गांधी यांच्यासोबत काम करायला हवे. जर असं झालं तर काँग्रेसला विजय मिळू शकतो अशी कबुलीच शर्मांनी दिली. राहुल गांधी मेहनत करताय. त्यांना पंतप्रधान सुद्धा व्हायचंय. पण दोघांनी मिळून काम केले तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

भाजपला उत्तर द्यायचं असेल आणि जास्तीत जास्त जागांवर निवडून यायचं असेल तर प्रियांका गांधींशिवाय पर्याय नाही असं आता काँग्रेसला वाटचं. प्रियांका गांधींचा करिष्मा निवडणुकीत उपयोगी पडू शकतो आणि भाजपला टक्कर देता येईल, असं वाटूनच या हालचाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2018 01:56 PM IST

ताज्या बातम्या