वाराणसीत नरेंद्र मोदींविरुद्ध लढणार प्रियांका गांधी; 'या' आमदाराने केला दावा

वाराणसीत नरेंद्र मोदींविरुद्ध लढणार प्रियांका गांधी; 'या' आमदाराने केला दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध काँग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांना मैदानात उतरणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. आता काँग्रेसच्या निकटवर्तीय आमदाराने याबाबत वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

वाराणसी, 19 एप्रिल : उत्तर प्रदेशमधील हायप्रोफाईल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध काँग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांना मैदानात उतरणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. याबाबत आता अमेठीच्या आमदाराच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नव्याने चर्चेला तोंड फुटलं आहे.

उत्तर प्रदेशात अमेठीच्या विधान परिषदेचे आमदार दीपक सिंह यांनी प्रियांका बनारसहून लढणार, असं म्हटलं आहे. दीपक सिंह हे गांधी परिवाराचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे प्रियांका मोदींविरोधात वाराणसीच्या मैदानात उतरणार या वृत्ताला आणखी आधार मिळाला आहे.

दीपक सिंह म्हणाले, "प्रियांका गांधी यांची निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी झाली आहे. प्रियांका गांधींची तशी मानसिक तयारीही झाली आहे. त्या आयर्न लेडी आहेत. एक धैर्यशील महिला अशी त्यांची ओळख आहे. अमेठीची निवडणूक संपल्यावर इथले लोक बनारस पोहोचणार आहोत, तिथल्या निवडणुकीच्या लढाईत उतरण्याची आमची तयारी झाली आहे."

आपण निवडणूक लढवणार नाही, असं अद्याप प्रियांका गांधी यांनी म्हटलेलं नाही. वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात अजूनही काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. त्यातच उत्तर प्रदेशातल्या अमेठीचे काँग्रेस आमदार दीपक सिंग यांनी प्रियांका बनारसमधून लढणार असं सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेस धक्का देण्याचा विचार करत आह.

याबाबत काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी प्रतिक्रिया दिली होती. 'कोणतीच गोष्ट अशक्य नसते. प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी, अशी आज संपूर्ण देशाची इच्छा आहे. याबाबत काय निर्णय होतो, हे आता वेळच ठरवेल. लवकरच याबाबतचा निर्णय समोर येईल,' असं राज बब्बर यांनी म्हटलं आहे.

गेल्या म्हणजेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानादेखील त्यांच्या विजयी मतांचे अंतर पाहता काँग्रेस सक्रीय झाली आहे. ज्याप्रमाणे राहुल गांधी यांना भाजपने अमेठीमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे मोदींना वाराणसीमध्ये घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अर्थात यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. वाराणसीतून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा करण्याआधी काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्याशी चर्चा करेल. या दोन्ही पक्षांकडून काँग्रेस पाठिंबा मागू शकते.

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवले होते तेव्हापासून वाराणसीमधील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी येथून निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत. काँग्रेसने प्रियांका गांधी यांना अद्याप उमेदवारी दिली नाही. आता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की PM मोदींनी घेरण्यासाठी काँग्रेस वाराणसी जागेतून त्यांना उमेदवारी देईल.

First published: April 19, 2019, 7:33 PM IST

ताज्या बातम्या