Home /News /national /

VIDEO : प्रियंका इन अॅक्शन, राहुल गांधीसोबत 9 तासांचा मॅरेथॉन रोड शो

VIDEO : प्रियंका इन अॅक्शन, राहुल गांधीसोबत 9 तासांचा मॅरेथॉन रोड शो

रोड शोला सुरूवात झाली आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

    लखनौ, 11 फेब्रुवारी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात दाखल झाल्या आहेत. तसंच त्यांच्या रोड शोलाही सुरूवात झाली आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावं, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जुनी मागणी होती. अखेर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका यांनी राजकारणात एंट्री केली आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा असून, त्यातील 42 जागांची जबाबदारी प्रियंका गांधींकडे आहे. प्रियंका आणि ज्योतिरादित्य शिंदे प्रत्येक मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना भेटून तेथील स्थिती जाणून घेणार आहेत. कसा असेल प्रियंका गांधी यांचा युपी दौरा? उत्तर प्रदेशात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे तिन्ही नेते रोड शोमध्ये सामील झाले आहेत. राहुल गांधी आजच दिल्लीला परतण्याची शक्यता असून, प्रियंकाचा दौरा मात्र चार दिवसांचा आहे. लखनौमध्ये प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य शिंदे 12 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. इतर बातम्या : VIDEO : पंकजा आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक कलगीतुरा; पाहा काय म्हणाले...
    First published:

    Tags: Priyanka, Rahul gandhi, Road show, UP

    पुढील बातम्या