अमेरिकेतून आल्यानंतर प्रियंका 'इन अॅक्शन', राहुलसह मोठ्या नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठक

अमेरिकेतून आल्यानंतर प्रियंका 'इन अॅक्शन', राहुलसह मोठ्या नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठक

या बैठकीत प्रियंका यांच्या उत्तर प्रदेशातील आगामी कार्यक्रमांबद्दल चर्चा झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी नुकत्याच अमेरिकेहून भारतात परतल्या आहेत. त्यानंतर त्यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशातील नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत प्रियंका यांच्या उत्तर प्रदेशातील आगामी कार्यक्रमांबद्दल चर्चा झाली आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया, महासचिव केसी वेणुगोपाल, युपी काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर हे नेते उपस्थित होते.

दरम्यान, मंगळवारी राहुल गांधी यांच्या निवासस्थान काँग्रेसची आणखी एक मोठी बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्यात येणार आहे.

प्रियंका ठरणार गेमचेंजर?

प्रियंका गांधी राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. उत्तरप्रदेश काँग्रेसने तर प्रियंका गांधींनी वाराणसीतून मोदींच्या विरोधात निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात आत्तापासून मोदी विरूद्ध प्रियंका यांच्यातल्या संभाव्य लढतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. वाराणसीतून तसंही मोदींविरोधात लढण्यासाठी विरोधकांकडे तुल्यबळ उमेदवार नाही. अशातच जर प्रियंका गांधी वाराणसीतून उभार राहिल्या तर मोठी लढत पाहायला मिळू शकते.

VIDEO : अण्णांच्या भेटीवरून मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

First published: February 4, 2019, 11:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading