मराठी बातम्या /बातम्या /देश /

'लाथ मारल्यानंतर केस ओढले', कोण आहेत भाजपच्या रॅलीत धक्काबुक्की झालेल्या प्रिया वर्मा

'लाथ मारल्यानंतर केस ओढले', कोण आहेत भाजपच्या रॅलीत धक्काबुक्की झालेल्या प्रिया वर्मा

वयाच्या 21 व्या वर्षी डीएसपी झालेल्या प्रिया वर्मा यांना रविवारी भाजपच्या तिरंगा रॅलीवेळी धक्काबुक्की झाली होती.

वयाच्या 21 व्या वर्षी डीएसपी झालेल्या प्रिया वर्मा यांना रविवारी भाजपच्या तिरंगा रॅलीवेळी धक्काबुक्की झाली होती.

वयाच्या 21 व्या वर्षी डीएसपी झालेल्या प्रिया वर्मा यांना रविवारी भाजपच्या तिरंगा रॅलीवेळी धक्काबुक्की झाली होती.

    भोपाळ, 20 जानेवारी : मध्यप्रदेशातील राजगड इथं भाजपने रविवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ एक रॅली काढली होती. यावेळी झालेल्या गोंधळात कार्यकर्त्यांकडून थेट उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांना मारहाण झाली. राजगढ इथल्या रॅलीमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर करडी नजर ठेवलेल्या प्रिया वर्मा यांचे केस ओढण्यात आले तसंच त्यांना धक्काबुक्कीही झाली. प्रिया वर्मा यांनी नवभारत टाइम्सशी बोलताना सांगितलं की, मला लाथही मारण्यात आली. प्रियांका वर्मा यांच्यावर राज्य सरकारच्या बाजूने काम केल्याचा आरोपही करण्यात आला. दिग्विजय सिंग यांनी प्रिया वर्मा यांचे समर्थन केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रियांका वर्मा म्हणाल्या की, मी माझं काम करत होते. मला माझं कर्तव्य पार पाडायचं होतं. मी कोणत्याही प्रकारच्या राजकीय भूमिकेतून कृती केलेली नाही. जर तुम्ही विरोधात रॅली काढलीत तरी माझं कर्तव्य आहे की परिस्थिती नियंत्रणात कशी राहिल आणि समर्थनार्थ रॅली असेल तरीही हेच करावं लागेल. कार्यकर्त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही. कलम 144 लागू असताना त्यांनी रॅली काढली. अनेक बड्या नेत्यांशी याबाबत चर्चा केली. त्यांच्याकडून 116 चे बॉण्ड भरले होते तरीही गोंधळ झाला. त्यांनी माझ्यासह आणखी एका अधिकाऱ्याचे कपडे ओढले. आम्ही या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात चला आपण चर्चा करू असं म्हटलं. पण ते स्वत:ची सुटका करून घेऊन पळत होती. कोणीतरी पाठीत लाथ मारली असं प्रिया वर्मा यांनी सांगितलं. प्रिया वर्मा यांनी 2014 मध्ये पीएससी परीक्षा दिली होती. त्याचा निकाल 2017 लागला होता. त्यानंतर प्रिया उज्जैनमधील भैरूगढ जेलमध्ये असिस्टंट सुपरिटेंडंट म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर 2015 च्या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा त्यांनी 10 वी रँक मिळवली. तेव्हा वयाच्या 21 व्या वर्षी त्या डीएसपी पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर 2017 च्या परीक्षेत चौथी रँक मिळवून डेप्युटी कलेक्टर झाल्या. सध्या प्रिया वर्मा आयएएसची तयारी करत आहेत. ATS ने मोठा घातपाताचा कट उधळला, पाकिस्तानी ISI एजेंटच्या मुसक्या आवळल्या
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: BJP, Deputy collector, IAS

    पुढील बातम्या