देशात कोणत्या खाजगी कंपनीत आहे नोकरीची संधी? मोदी सरकार देणार माहिती

देशात कोणत्या खाजगी कंपनीत आहे नोकरीची संधी? मोदी सरकार देणार माहिती

तुम्ही नोकरी शोधताय का ? मग तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाइट्स तपासायची गरज नाही. केंद्र सरकारने त्यासाठी आता एक खास व्यवस्था केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : तुम्ही नोकरी शोधताय का ? मग तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाइट्स तपासायची गरज नाही. केंद्र सरकारने त्यासाठी आता एक खास व्यवस्था आणली आहे. देशभरातल्या खाजगी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी असेल तर त्याची माहिती तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळेल.

यासाठी एम्प्लॉयमेंट एक्सेंजला मॉडेल करिअर सेंटर केलं जाणार आहे. ही केंद्रं एकमेकांशी जोडलेली असतील. कायद्यानुसार सगळ्याच कंपन्यांना या वेबसाइटवर नोकऱ्यांची माहिती देणं बंधनकारक असेल. नोकरीच्या संधींबद्दल योग्य माहिती दिली नाही तर दंडही भरावा लागेल.

बेरोजगारीवर उपाय

आर्थिक मंदी आणि बेरोजगारीमुळे मोदी सरकारवर टीका होतेय. त्यामुळेच सरकारने हा नवा उपक्रम सुरू केला आहे. कोणत्याही कंपनीत जर 25 पेक्षा जास्त जागा असतील तर त्याची माहिती मॉडेल करिअर सेंटरवर द्यावीच लागेल. सध्या सुरू असलेल्या एम्प्लॉयमेंट एक्सेंजच्या कामगिरीवर सरकार खूश नाही. त्यामुळेच हा बदल करण्यात आला आहे.

EPFO ची महत्त्वाची भूमिका

कंपनीने किती लोकांना नोकऱ्या दिल्या याबद्दलची माहिती सरकार EPFO नोंदणीच्या माध्यमातून घेऊ शकतं. या वेबसाइटवर नोकरीच्या किती संधी आहेत याची माहिती मिळू शकेल. नोकरी मिळाल्यानंतर उमेदवाराला आपलं नाव यावरून हटवावं लागेल. यामुळे सरकारला खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची योग्य आकडेवारीही मिळू शकेल. या संधीचा लाभ जास्तीत जास्त तरुणांनी घ्यावा, अशी सरकारची अपेक्षा आहे.

(हेही वाचा : आता मालमत्ता खरेदीत होणार नाही फसवणूक, मोदी सरकारने आणले नवे नियम)

नोकरी मिळवण्यासाठी कॅम्पस इंटर्व्ह्यू,नोकरी डॉट कॉम यासारखी नोकरी मिळवून देणारी वेबसाइट असे काही मार्ग आहेत. पण सरकारच्याच अधिकृत वेबसाइटवर नोकरीच्या संधींबद्दलची माहिती मिळत असेल तर ते खूपच फायदेशीर ठरणार आहे.

=================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobmoney
First Published: Dec 17, 2019 07:35 PM IST

ताज्या बातम्या