कोरोनामुळे 3 महिने पगार नाही, नैराश्यात दिव्यांग शिक्षिकेनं नदीत उडी मारून केली आत्महत्या

कोरोनामुळे 3 महिने पगार नाही, नैराश्यात दिव्यांग शिक्षिकेनं नदीत उडी मारून केली आत्महत्या

एका दिव्यांग शिक्षिकेनं आर्थिक तीन महिने पगार नाही म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

पाटना, 06 जुलै : कोरोनामुळं बरेच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. परिणामी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांना याचा सगळ्याच मोठा फटका बसला आहे. अशाच एका दिव्यांग शिक्षिकेनं आर्थिक तीन महिने पगार नाही म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजधानी पाटण्यातील फतुहा पोलीस स्टेशन भागात आर्थिक अडचणींना कंटाळून या अपंग विधवा शिक्षिकेने पूनपुन नदीत उडी मारून आत्महत्या केली. स्थानिक लोकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या मृतदेहाचा शोध सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून अपंग महिला शिक्षिकेची ट्राय सायकल जप्त केली आहे.

पूनपुन नदीत उडी मारणाऱ्या या महिला शिक्षिकेची ओळख पटली असून तिचे नाव शांती देवी आहे, अशी माहिती पोलीस स्टेशन परिसरातील गोविंदपूर येथे आहे. त्या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून तैनात होती. शांती देवी यांच्या पतीचे 2 वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आपल्या दोन मुलांचा संगोपन करण्यासाठी त्यांनी एका खासगी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली. मात्र कोरोनामुळे गेल्या 3 महिन्यांपासून शाळा बंद असल्यामुळे तीन महिने पगार देण्यात आला नव्हता. परिणामी या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला ज्यामुळे शांती देवी खूप चिंतेत होत्या.

वाचा-मुंबईत कोरोना कधीपर्यंत संपूर्ण नियंत्रणात येणार? आता BMC नेच सांगितली तारीख

या नैराश्यात शांती देवी यांनी पूनपुन पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. महिला शिक्षिकेच्या घरातून पोलिसांनी सुसाइड नोट्सही जप्त केल्या आहेत. या घटनेबद्दल विचारले असता स्थानिक लोकांनी आणि त्यांच्या मुलीने त्या काही दिवसांपासून चिंतेत असल्याचे सांगितले. त्यामुळे नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

वाचा-वयाच्या 80 वर्षी पत्नीसह बळीराजाची दुबार पेरणी, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

वाचा-कोरोनापेक्षाही भयंकर आहे ब्यूबॉनिक प्लेग, 14 दिवसात अशी होते शरीराची अवस्था

Published by: Manoj Khandekar
First published: July 6, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading