S M L

वैद्यकीय आयोग विधेयकाच्या निषेधार्थ खाजगी डॉक्टरांचा देशव्यापी संप

वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी आज मंगळवारी देशातील खासगी वैद्यकीय सेवांमधील डॉक्टरांनी १२ तास ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांचा हा निशेष आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2018 12:31 PM IST

वैद्यकीय आयोग विधेयकाच्या निषेधार्थ खाजगी डॉक्टरांचा देशव्यापी  संप

02 जानेवारी : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी आज मंगळवारी देशातील खासगी वैद्यकीय सेवांमधील डॉक्टरांनी १२ तास ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांचा हा निशेष आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये मात्र वैद्यकीय सेवा देण्यात येईल, असं आयएमएने स्पष्ट केले आहे.

सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. नव्या विधेयकामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेचा आणि सहभागाचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही आणि विधेयकामुळे भ्रष्टाचाराला पाठींबा मिळतोय असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन केला आहे.

पाहूयात डॉक्टरांचं म्हणणं काय ?  


- मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी परवानगीची गरज नाही.

- यामुळे खासगी मेडिकल कॉलेजेसना अभय मिळेल.

- फक्त 40 टक्के जागांवर सरकारचं नियंत्रण असणार.

Loading...

- 60 टक्के जागांची फी खासगी कॉलेजेस ठरवणार.

- अशा परिस्थितीत गरीब विद्यार्थ्यांनी काय करायचं ?

- 5 ते 100 कोटींच्या दंडाची तरतूद आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव.

- नॅशनल मेडिकल काऊंन्सिलमध्ये फक्त 5 राज्यांचा समावेश

- इतर राज्यांनी आपली बाजू कशी मांडायची ?

- परदेशी डॉक्टरांना भारतात प्रॅक्टिस करण्याची परवानगी नको.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 09:42 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close