आग्रा, 19 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील आग्रा इथं फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक करण्यात आली आहे. बस हायजॅक केल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्रामहून मध्य प्रदेशकडे जाणार्या खासगी बस हायजॅक करण्यात आली आहे. चालक आणि कंडक्टरला बसमधून उतरून बस अज्ञात स्थळी नेण्यात आली आहे.
ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. मालपुरा भागात या खासगी बसचे अपहरण करण्यात आले. या बसमध्ये 34 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. वाहनचालक व कंडक्टरने माहिती दिल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सर्व उच्च अधिकारी यावेळी उपस्थित आहेत. मात्र, बसविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
स्वत: ला फायनान्स कंपनीचा कर्मचारी सांगून केलं अपहरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपी फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून बसमध्ये घुसले. चालक व कंडक्टर यांना बसमधून उतरवून त्यांनी बस अज्ञात स्थळी घेऊन गेल्याची माहिती आहे. चालक आणि कंडक्टरने दिलेल्या माहितीनुसार, 4 जण कर्मचारी असल्याचे सांगून बसमध्ये घुसले.
पोलिस व चालक श्रीराम फायनान्स कंपनीचे नाव घेत आहेत
प्रवाशांनी भरलेल्या बसचे अपहरण केल्या प्रकरणी खासगी बसचा चालक आणि पोलीस श्रीराम फायनान्स कंपनीचे नाव घेत आहेत. या फायनान्स कंपनीचे लोक जायलो एसयूव्ही गाडीतून आले आणि त्यांनी बस ताब्यात घेतली, अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस अपहरण करणाऱ्यांनी चालक व कंडक्टरला ढाब्यावर जेवण दिले सोबत 300 रुपयेही दिले. मात्र, बस सध्या कुठे आहे, याबाबत कोणालाच माहिती नाही आहे.
इटावा, कानपूरमार्गे बस ग्वाल्हेरला गेली बस
इटावा टोल प्लाझावरून मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 2.15 वाजता बस ओलांडून कानपूरकडे निघाली. बस ग्वाल्हेरच्या दिशेने गेली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे बुधवारी आग्रा येथे फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक केली. ही बस गुरुग्रामहून मध्य प्रदेशकडे जात होती. चालक आणि कंडक्टरला उतरुन बस अज्ञात ठिकाणी नेली आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या घटनेची आहे.