Home /News /national /

लग्नानंतर झाली जन्मठेप; बाप होण्यासाठी आरोपीला मिळाला 15 दिवसांचा पॅरोल

लग्नानंतर झाली जन्मठेप; बाप होण्यासाठी आरोपीला मिळाला 15 दिवसांचा पॅरोल

बिहारमध्ये हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या एका आरोपीला अपत्याला जन्म देण्यासाठी कोर्टाने 15 दिवसांचा पॅरोल (Parole) दिला आहे. पाटणा हायकोर्टाने (Patna High court) हा निर्णय दिला आहे.

पाटणा, 23 एप्रिल: बॉलिवूडचा 'मुद्दत' हा चित्रपट तुम्हाला आठवतो का? या सिनेमात वकीलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री जयाप्रदा वंशवृद्धीसाठी चित्रपटाचा हिरो मिथुन चक्रवर्ती याला पॅरोलवर सोडावं अशी विनंती कोर्टात करते असं दाखवलं आहे. तशीच कहाणी प्रत्यक्षात घडली आहे. बिहारमध्ये हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या एका आरोपीला अपत्याला जन्म देण्यासाठी कोर्टाने 15 दिवसांचा पॅरोल (Parol) दिला आहे. पाटणा हायकोर्टाने (Patna High court) हा निर्णय दिला आहे. पॅरोलची सर्व प्रक्रिया कायदेशीर करण्यात आली आहे. विकी कुमार असं आरोपीचं नाव आहे. हे वृत्त हिंदुस्तान लाईव्हने दिलं आहे. आरोपी विकी कुमार हा नालंदा जिल्ह्यातील उतरनावा गावचा रहिवासी आहे. 2012 मध्ये एका हत्येच्या प्रकरणात त्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो बिहारच्या शरीफ जेलमध्ये (Sharif Jail Bihar) शिक्षा भोगतोय. वकीलांच्या सल्ल्यानुसार विकीची पत्नी रंजिताने अपत्याला जन्म देण्यासाठी विकीला पॅरोलवर सोडण्यात यावं, अशी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. रंजिताच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने विकीला 15 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात यावं, असा आदेश दिला आहे. जेल अधीक्षकांना हायकोर्टाचे आदेश प्राप्त झाले आहेत. वकील देवेंद्र शर्मा यांच्या सल्ल्यानुसारच रंजिताने ही याचिका दाखल केली होती. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयामुळे विकी आणि रंजिता खूश आहेत. (हे वाचा-ऑक्सिजन कोविड सेंटर सुरू होताच अवघ्या काही तासात झालं हाऊसफुल्ल!) विकीनं सांगितलं की लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी हत्येच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात जावं लागलं. तुरुंगातील भेटीदरम्यान विकीने याबद्दल देवेंद्र शर्मा यांना सांगितलं. त्यानंतर शर्मांच्या सल्ल्यानुसार विकीची पत्नी रंजिताने पाटणा हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत विकीला पॅरोलवर सोडण्याचा निर्णय दिला. (हे वाचा-पर्यटकांचा बेफिकीरपणा; बॉल गिळल्यानं प्राणी संग्रहालयातील पोलर बिअरचा मृत्यू) याप्रकरणी हायकोर्टाचे वकील गणेश शर्मांनी सांगितलं की आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वकील देवेंद्र शर्मांच्या सल्ल्यानुसार रंजिताने 2019 मध्ये विकीला पॅरोलवर सोडण्यात यावं, अशी याचिका हायकोर्टात दाखल केली. विकीला न सोडल्यास तिला आयुष्यभर मुलांशिवाय राहावं लागेल, असं तिनी याचिकेत म्हटलं होतं. तिची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने विकीला सोडण्याचा निर्णय दिला. दरम्यान, आतापर्यंत अनेक आरोपींना लग्न, जवळच्या नातेवाईंकांच्या अंत्यसंस्काराठी पॅरोल देण्यात आल्याची प्रकरणं आहेत. मात्र, पहिल्यांदाच मुल जन्माला घालण्यासाठी एका आरोपीला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा आहे.
First published:

Tags: Bihar, Patna

पुढील बातम्या