दोनशे रुपयांची नवीन नोट लवकरच बाजारात

दोनशे रुपयांची नवीन नोट लवकरच बाजारात

सरकारच्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने या नोटेची छपाई सुरू केली आहे. त्यामुळे ही नोट लवकरच चलनात येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

29 जून : गेल्या वर्षी ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्यानंतर आता सरकारने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारच्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने या नोटेची छपाई सुरू केली आहे. त्यामुळे ही नोट लवकरच चलनात येण्याची शक्यता आहे.

दैनंदिन व्यवहारात देवाणघेवाण सोपी व्हावी म्हणून ही नोट चलनात आणण्यात येत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलं आहे.

नव्या नोटा चलनात आणण्यासाठी काम पाहत असलेल्या दोन  व्यक्तींनी सांगितलं की रिझर्व्ह बँकेने काही आठवड्यांपूर्वीच नोटांच्या छपाईसाठी आदेश दिले होते. त्यानंतरच सरकारी छापखान्यांमध्ये या नोटांच्या छपाईचं काम सुरू झालं आहे.

First published: June 29, 2017, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading