पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला खर्च होतात 600 कोटी

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला खर्च होतात 600 कोटी

SPGमध्ये सध्या 300 कमांडोंचा समावेश आहे. यांना अतिशय अतिशय कठीण असं प्रशिक्षण दिलं जातं. त्या नंतर यासाठी त्यांची निवड केली जाते.

  • Share this:

नवी दिल्ली 02 फेब्रुवारी : पंतप्रधान हा देशाचा सर्वोच्च कार्यकारी प्रमुख असतो. देशातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च सुरक्षा नियमांचं पालन केलं जाते. त्यासाठी जगातली अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन माजी पंतप्रधानांची हत्या झाल्यानंतर पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीच्या सुरक्षेत अभुतपूर्व वाढ करण्यात आली आहे. इंदिरा गांधी यांची तर पंतप्रधानपदावर असताना हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खास पथक तयार करण्यात आलं होतं. त्यालाच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)असंही म्हणतात. या SPGसाठी यावर्षी बजेटमध्ये तब्बल 600 कोटींची तरतूद करण्यात आलीय.

SPGमध्ये सध्या 300 कमांडोंचा समावेश आहे. यांना अतिशय अतिशय कठीण असं प्रशिक्षण दिलं जातं. त्या नंतर यासाठी त्यांची निवड केली जाते. मागच्या वर्षी 540 कोटींची तरतूद करण्यात आली होती. पंतप्रधानांचे देश विदेशातले दौरे, त्यांचं निवासस्थान, त्यांचं कुटुंबीय या सगळ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन एसपीजीचं संरक्षण कव्हर दिलं जातं.

LIC च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन, केंद्र सरकारच्या बजेटवरील 'या' निर्णयावर नाराजी

याधी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही SPG संरक्षण दिलं जात होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी SPG कायद्यात दुरुस्ती करत ते फक्त पंतप्रधानांपुरतच मर्यादीत ठेवण्यात आलं होतं. त्यावरून वादही झाला होता. सरकारने ही दुरुस्ती गांधी कुटुंबीयांचं संरक्षण काढून घेण्यासाठीच केली असा आरोप काँग्रेसने केला होता.

हेही वाचा...

आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या

शेम ऑन यू पाकिस्तान गव्हर्नमेंट, भारताकडून काहीतरी शिका; पाक विद्यार्थ्याचा रोष

First published: February 2, 2020, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading