माझ्यावर अनेक आरोप पण देशासाठी सहन करावं लागेल : PM मोदी

माझ्यावर अनेक आरोप पण देशासाठी सहन करावं लागेल : PM मोदी

मोदी म्हणाले की, माझ्यावर आरोप केले, लोकांनी राग काढला तरी देशहिताचे निर्णय घेतच राहीन. देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मोहिम सुरु आहे आणि ते इतकं सोपं नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे लक्ष्य असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं आहे. अॅशोचॅमच्या परिषदेत मोदी बोलत होते. ते म्हणाले की, माझ्यावर आरोप केले, लोकांनी राग काढला तरी देशहिताचे निर्णय घेतच राहीन. देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मोहिम सुरु आहे आणि ते इतकं सोपं नाही. खूप काही सहन कराव लागेल आणि देशासाठी करावं लागतं असंही मोदी म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था 5 ते 6 वर्षांपूर्वी दिशाहीन होती. आमच्या सरकारने यात फक्त स्थैर्य आणण्याचा प्रयत्न केला नाही तर व्यवस्थेत शिस्त निर्माण केली. अनेक दशकांपासून असलेली उद्योगांची मागणी पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं असं मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ASSOCHAM च्या वार्षिक परिषदेत बोलताना भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल मत मांडले. ते म्हणाले की, आम्ही अर्थव्यवस्थेची विभागवार घडी बसवण्याचा प्रयत्न केला. नव तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

अथक परिश्रम, दिवस आणि रात्र काम केल्यानंतर व्यवसायात एक उंची गाठता. तुमच्या पॉलिसीत बदल करायचा असतो तेव्हा अगदी ग्राउंड लेव्हलपासून सुरूवात करावी लागते. पारदर्शकता आणण्यासाठी करव्यवस्थेबाबत काही पावलं उचलली जात आहेत असंही मोदींनी सांगितले.

मोदींच्या अलीकडील निर्णयांमुळे धोका वाढला

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणांनी मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. असे म्हटले जाते की, 12 डिसेंबर रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) , 9 नोव्हेंबरला राम जन्मभूमी निकाल आणि 5 ऑगस्ट रोजी काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविल्यापासून पंतप्रधानांना जास्त धोका होता. याशिवाय पाकिस्तानमधील बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या ठिकठिकाणी झालेल्या विध्वंसमुळे दहशतवादी संघटनाही संतापल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या बाजूने होणारा हल्ला नाकारता येणार नाही.

PM नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका, भाजपच्या रॅलीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 12:42 PM IST

ताज्या बातम्या