PM मोदींचं गृहराज्य झालं भ्रष्टाचाराचा अड्डा! 5 वर्षात 40 हजार तक्रारी दाखल

PM मोदींचं गृहराज्य झालं भ्रष्टाचाराचा अड्डा! 5 वर्षात 40 हजार तक्रारी दाखल

एकीकडे देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी वेगवेगळे नियम लादणाऱ्या मोदींच्या राज्यातच अशी परिस्थिती खरतर निंदनीय आहे.

  • Share this:

गांधीनगर, 22 सप्टेंबर : भारतातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक उपाययोजना केल्या. सर्वात गाजलेला त्यांचा निर्णय म्हणजे नोटाबंदीचा. या निर्णयाचा प्रमुख उद्देश होता भ्रष्टाचार रोखणे. मात्र नुकत्याच एका अहवालातुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य असलेले गुजरात हे राज्य भ्रष्ट राज्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळं मोदींच्या राज्यात काय चालययं काय असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. एकीकडे देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी वेगवेगळे नियम लादणाऱ्या मोदींच्या राज्यातच अशी परिस्थिती खरतर निंदनीय आहे.

रिपोर्टनुसार, सर्वात जास्त भ्रष्टाचार हा तमिळनाडू आणि ओडिसा या राज्यांमध्ये झाला आहे. यानंतर क्रमांक लागतो तो गुजरातचा. गुजरातमध्ये गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराच्या 40 हजार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. हा रिपोर्ट गृहमंत्री प्रदीप सिंग जडेजा यांनी सादर केला आहे. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंध विभागानं दिलेल्या माहितीनुसार 2017 आणि 2018मध्ये भ्रष्टाचाराच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. गुजरातमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार हा महसुल विभागात झाला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नागरी विकास आणि तिसऱ्या क्रमांकावर गृह मंत्रालय विभागाचे नाव आहे. निती आयोगानं प्रति कोटी नागरिकांमागे तमिळनाडूत सरासरी 2 हजार 492.45 तर ओडिसात 2 हजार 489.83 असा आकडा दिला आहे.

वाचा-लोकलपासून ते ग्लोबलपर्यंत 'Howdy Modi'चीच चर्चा, काय आहे शब्दाचा अर्थ?

गुजरात भ्रष्टाचारात तिसऱ्या क्रमांकावर

गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचाराच्या खटल्यांमध्ये 800 सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात महसुल विभाग आघाडीवर आहे. दरम्यान महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लगाम लावण्यात सरकार अपयशी झाले आहे, अशी सबब गृहमंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.

वाचा-लोकलपासून ते ग्लोबलपर्यंत 'Howdy Modi'चीच चर्चा, काय आहे शब्दाचा अर्थ?

दररोज 21 तक्रारी होतात दाखल

गेल्या पाच वर्षात गुजरातमध्ये 40 हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर, गेल्या पाच वर्षांतील 1 हजार 84 दिवसांमध्ये प्रत्येकदिवशी 21 तक्रारी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, या आकड्यांनंतर सरकारनं आम्ही तक्रारी आल्यानंतर लगेचच संबंधितांवर कारवाई करत आहोत, असे सांगितले.

वाचा-अमेरिकेत पोहोचलेल्या PM मोदींवर कौतुकाचा वर्षाव, असं नेमकं काय केलं पाहा VIDEO

'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: September 22, 2019, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading