मराठी बातम्या /बातम्या /देश /

PM मोदींचं सोशल मीडिया अकाऊंट हॅंडल करणाऱ्या 'या' आहेत कर्तृत्ववान महिला

PM मोदींचं सोशल मीडिया अकाऊंट हॅंडल करणाऱ्या 'या' आहेत कर्तृत्ववान महिला

आज दिवसभरात सात कर्तृत्ववान महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडियावर आपल्या आठवली शेअर करणार आहेत

आज दिवसभरात सात कर्तृत्ववान महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडियावर आपल्या आठवली शेअर करणार आहेत

आज दिवसभरात सात कर्तृत्ववान महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडियावर आपल्या आठवली शेअर करणार आहेत

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त (International Women's Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी समाज माध्यमातून महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मोदी म्हणाले, आम्ही नारी शक्तीची भावना आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो. ते म्हणाले, जसं की मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं, त्यानुसार आज दिवसभर वेळोवेळी सात महिला माझा सोशल मीडिया अकाऊंट सांभाळतील आणि त्यांच्या जीवनातील आठवणी शेअर करतील.

भुकेल्यांना अन्नदान करणारी स्नेहा मोहनदास

नरेंद्र मोदींच्या अकाऊंटवरुन पहिल्यांदा स्नेहा मोहनदास यांनी आपली कथा शेअर केली आहे. त्या बेघरांना खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या फूडबँक इंडियाच्या संस्थापिका आहेत. त्या म्हणाल्या की लोकांना जेवू घालण्य़ाची सवय त्यांना आपल्या आईकडून मिळाली. पुढे त्यांनी सांगितलं की, ज्यांना दोन वेळंच जेवण मिळणं ही अवघड होतं अशा गरीबांसाठी मी 'फूडबँक इंडिया' नावाच्या अभियानाची सुरुवात केली. यासाठी मी स्वयंसेवकांसोबत काम केले. यामध्ये अधिकतर परदेशी लोक होते. हे अभियान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही विविध बैठका घेतल्या आणि अधिकाधिक लोकांना यामध्ये सहभागी करुन घेतले. याव्यतिरिक्त आम्ही कुकिंग मॅरेथॉन, स्तनपान जागरुकतासारखे अभियानही सुरू केले. माझी सर्वांना विनंती आहे की, कमीत कमी एका गरीब, भुकेल्या व्यक्तीला अन्नदान करा.

बस बॉम्बस्फोटात हात गमावणाऱ्या मालविका ठरल्या दुसऱ्या कर्तृत्ववान महिला

स्नेहा मोहनदासनंतर मालविका अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन आठवणी शेअर केल्या आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, 'आपण जीवन नियंत्रित करू शकत नाही. मात्र आपण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू करू शकतो. आव्हानांना आपण कशाप्रकारे सामोरे जातो हे अधिक महत्त्वाचं असतं.' यावेळी त्यांनी सांगितलं की, 13 वर्षांची असताना एका बसमधील स्फोटात त्यांनी दोन्ही हात गमावले. 'मात्र तरी मी थांबले नाही. मी पीएचडीचं शिक्षण घेतलं. कोणतीही गोष्टी सोडून देणे हा पर्याय कधीच असू शकत नाही. आपल्या मर्यादा विसरुन जा आणि विश्वास व आशेने पुढे जा.'

सोमवारी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं होतं. फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेजला 44,723,734 लाइक्स आहेत. तर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या 44,598,804 इतके आहे. ट्विटरवर मोदींना 53.3 मिलियन लोक फॉलो करतात. तर मोदी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन 2,373 लोकांना फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर मोदींना 35.2 मिलियन लोक फॉलो करतात. यूट्यूबवर मोदींचे 4.51 मिलियन सबस्क्रायबर आहेत.

First published:

Tags: BJP narendra modi, International womens day, Social media