Home /News /national /

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा CM उद्धव ठाकरेंना फोन, पूराच्या संकटात दिलं मदतीचं आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा CM उद्धव ठाकरेंना फोन, पूराच्या संकटात दिलं मदतीचं आश्वासन

Maharashtra flood: शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राने तातडीने आर्थिक मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली.

    नवी दिल्ली 16 ऑक्टोबर: मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रचंड नुकसान झालं आहे तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्य कोरोनाशी लढत असताना हे नवं संकट आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि राज्यातल्या पूरस्थितीची माहिती घेतली. पंतप्रधानांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. पूरामुळे नुकसान झालेल्या सर्व नागरीकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या संकटाच्या काळात केंद्राकडून पूर्ण मदत देण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांना राज्यातल्या स्थितीची माहिती दिली आणि तातडीची कुठली मदत पाहिजे ते सांगितलं. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राने तातडीने आर्थिक मदत करावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर या भागात पावसामुळे मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून सगळं पिकं हातातून गेलं आहे. दरम्यान, राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडून जिल्ह्यांमधील परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला आणि तातडीची मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या