अहमदाबाद 31 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत सगळ्यांनी मदत करावी असं आवाहन केलं होतं. त्यासाठी PMCARES हा निधी उभारण्यात आला होता. देशभरातून त्यासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. उद्योगपती, अभिनेते, बड्या कंपन्या असे सगळेच यात भरभरून मदत करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपल्या बचतीमधून 25 हजारांची देणगी दिली आहे. हिराबेन या अहमदाबामध्ये राहतात. नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक वाढदिवसाला आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबादला येत असतात. हिराबेन यांनी या आधीही नैसर्गिक संकटांच्या वेळी अशा प्रकारची मदत केली आहे.
Coronavirus च्या महासाथीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यासाठी Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund स्थापन करण्यात आला आहे. Covid-19 च्या लढाईसाठी बळ म्हणून ज्या नागरिकांना छोट्या -मोठ्या प्रमाणावर दान करायचं आहे त्यांनी PM Cares Fund ला आपलं योगदान द्यावं, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.
पंतप्रधान मोदींनी हे आवाहन केल्याबरोबर लगेचच बॉलिवूड स्टार अक्षय कुमार पुढे सरसावला आहे. आपण पंतप्रधानांच्या या फंडासाठी माझ्या पुंजीतून 25 कोटींचा निधी देण्याचं वचन देतो, असं Tweet अक्षयने केलं. मोदींनी त्याची लगेच दखल घेत आभार मानले आहेत.
<
< फंडाची घोषणा करताना पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, कुठलीही छोटी रक्कम तुम्ही या फंडासाठी देऊ शकता. त्यासाठी SBI मध्ये PM Cares नावाच्या खात्यात निधी थेट जमा करायचा आहे. त्यासाठीचे अकाउंट डिटेल्सही पंतप्रधानांनी शेअर केले आहेत.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.