पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तरुणांना LinkedIn संदेश, लॉकडाऊनदरम्यान बदललेल्या जीवशैलीकडे वेधले लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तरुणांना LinkedIn संदेश, लॉकडाऊनदरम्यान बदललेल्या जीवशैलीकडे वेधले लक्ष

यावेळी पंतप्रधानांनी बदललेल्या जीवनशैलीविषयीही वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

नई दिल्ली: देशात कोरोनाच्या (Coronavirus) संकटात जारी केलेल्या लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी जनतेला भावनिक आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे बदललेल्या जीवनशैलीबाबत संदेश दिला आहे. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, की कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी एकता आणि बंधुभाव आवश्यक आहे. कोरोना हल्ला करण्यापूर्वी धर्म, जात, रंग, भाषा आणि सीमा नाही पाहत. मोदींनी लिंक्डइन पोस्टमध्ये म्हणाले, या कठीण प्रसंगी आपणा सर्वांना एकत्र येऊन लढा द्यायचा आहे.

मोदींनी पुढे लिहिले की, कोरोनाव्हायरसमुळे सर्वांचंच आयुष्य बदललं आहे. आपलं घरंच आपलं कार्यालय झालं आहे. इंटरनेट आपली नवी मीटिंगची खोली आहे. कार्यालयातील सहकार्यांसोबत काही वेळासाठी ब्रेक घेणं आता इतिहासात जमा झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन सांगितले की संपूर्ण जग कोविड - 19 शी लढा देत आहे. यामध्ये भारतातील ऊर्जावान व प्रगतीशील तरुण अधिक स्वस्थ आणि समृद्ध भविष्यासाठी मार्ग दाखवू शकतात.

सध्या देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यात अनेक राज्यांमध्ये काही प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. गोव्यात तर 3 एप्रिलनंतर एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मकता वाढली आहे.

संबंधित - आनंदाची बातमी! गोवाही झालं कोरोनामुक्त, 3 एप्रिलनंतर एकही रुग्ण नाही

चीनने पसरवला का कोरोना? अमेरिकेच्या दाव्यावर वुहानच्या लॅबनं दिलं उत्तर

 

First published: April 19, 2020, 8:23 PM IST

ताज्या बातम्या