पंतप्रधान मोदींचं भाषण दाखविण्यास नकार, दूरदर्शनचा अधिकारी निलंबित

पंतप्रधान मोदींचं भाषण दाखविण्यास नकार, दूरदर्शनचा अधिकारी निलंबित

वरिष्ठांनी सांगूनही या अधिकाऱ्याने पंतप्रधानांचं IIT मद्रास मध्ये झालेलं भाषण दाखविण्यास नकार दिला होता.

  • Share this:

नवी दिल्ली 02 ऑक्टोंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण हे देशातल्या सर्वच वाहिन्यांवर कायम दाखवलं जातं. त्यात जर ते चॅनल दुरदर्शनचं असेल तर मग त्यावर ते हमखास दाखवलच जातं. याच कामात कुचराई केल्याच्या आरोपांवरून चेन्नई दूरदर्शनच्या एका अधिकाऱ्याचा निलंबित करण्यात आल्याची घटना घडलीय. प्रसार भारतीने शिस्तभंगाच्या कारणांवरून या अधिकाऱ्याला निलंबित केलंय. मात्र कारवाई करताना त्यांनी त्याचं कारण सांगितलेलं नाही. सांगूनही या अधिकाऱ्याने पंतप्रधानांचं IIT मद्रास मध्ये झालेलं भाषण दाखविण्यास नकार दिला होता अशी माहिती दिली जातेय. आर वसुमथी असं त्या अधिकाऱ्यांचं नाव असून ते चेन्नईतल्या दूरदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक आहेत.

'सपा'शी फाटता फाटता जुळलं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटपाचं घोडं अजुन अडलेलंच

30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं IIT मद्रासमध्ये दिक्षांत समारोहात भाषण होतं. ते भाषण Live दाखवावं असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र स्पष्ट आदेश असूनही वसुमथी यांनी आदेशाचं पालन न करता भाषण दाखविण्यास नकार दिला होता अशी माहिती दिली इंडिया टुडे ने दिली आहे. IIT मद्रासमध्ये दिक्षांत समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात तरुणांना इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाबद्दल संशोधन आणि मुलभूत काम करण्याचा सल्ला दिला होता.

महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ खडसेंचा पत्ता कट होणार?

सरकारी अधिकारी असल्याने प्रत्येक अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या आदेशाचं पाल करावं लागतं. त्यात जर पंतप्रधानांसारखी महत्त्वाची व्यक्ती असेल तर जास्त काळजी घेतली जाते. मतं पटो किंवा न पटो अधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठांच्या निर्देशांचं पालन करावं लागतं. असं न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाते. त्यामुळे याच नियमांनुसार ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 2, 2019, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading